उन्हाळ्यात कलिंगड खाणं महत्त्वाचं ठरतं. या फळामध्ये 90% पाणी असते. शरीरातील उष्णता नैसर्गिक पद्धतीने कमी करण्यास कलिंगड मदत करते.
उन्हाळ्यात खरबूजाचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
उन्हाळ्यात मिळणारे आंबट गोड फळं म्हणजे द्राक्ष. द्राक्षांमध्ये पोटॅशिअम आणि मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. या फळामध्येदेखील मोठ्या प्रमाणात पाणी असते.
उन्हाळ्यात ताडगोळ्याचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. ताडगोळ्यातदेखील मोठ्या प्रमाणात पाणी असतं. याशिवाय यात पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते.
उन्हाळ्यात मिळणार आणखी एक पाणीदार फळ म्हणजे जाम. या फळाचा आकार लहान असला तरी त्यात भरपूर पाणी असते.
आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. आंब्याच्या फळांमध्ये 20 पेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि भरपूर फायबर असतात.
संत्र्यामध्ये जवळपास 80% पाणी आणि 20% फळांचा पल्प असतो. उन्हाळ्यातील फळांच्या यादीत ते एक महत्त्वाचे फळ आहे कारण ते आपल्या शरीराला हायड्रेट ठेवतात.
उन्हाळ्यात अननस आपल्याला हायड्रेट ठेवते. ते व्हिटॅमिन C, B6, A, खनिजे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि इतर तंतूंनी युक्त असतात.