लग्नबंधनात अडकल्यावर पती-पत्नीचं नातं दृढ होतं.
ते एकमेकांसोबत मनातली प्रत्येक गोष्ट शेअर करतात.
पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही तुमच्या पती/पत्नीसोबत शेअर करू नये.
असं केल्यास तुमचं वैवाहिक जीवन अडचणीत येऊ शकतं.
पतीला कधीही तुमच्या सेविंग्सबद्दल सांगू नका, अडीअडचणीला त्याच उपयोगी पडतील.
पतीसमोर एक्सचं कौतुक करू नका, किंवा सतत त्याच्याबद्दल बोलू नका.
सासरच्या मंडळींना पतीसमोर नावं ठेवू नका, त्याला वाईट वाटू शकतं.
तुमच्या कोणत्याही मित्रासोबत पतीची तुलना करू नका.
बहीण किंवा बेस्टफ्रेंडसोबत तुम्ही जे बोलता ते सगळंच्या सगळं पतीला सांगू नका.
ऑफिस कलिग्सबद्दल सतत पतीसोबत बोलू नका.