Sleep Tips : उकाड्यामुळे येत नाही झोप? वापरा या सोप्या ट्रिक्स

| Sakal

चांगली झोप गरजेची

चांगली आणि शांत झोप आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी गरजेची असते. यामुळे पचन संस्था, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच तणाव दूर होतो.

| Sakal

झोपेसाठी टिप्स

उन्हाळ्यात उकाड्यामुळे रात्री झोप येण्यास बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळेच आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची झोप पूर्ण होईल.

| Sakal

गरम दूध

झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध पिणे फायद्याचे ठरते. दररोज याची सवय लावल्याने तुमची झोप सुधारते.

| Sakal

चंपी

झोपण्यापूर्वी डोक्याला तेल लाऊन मसाज केल्याने देखील फायदा होतो. यामुळे डोकं शांत होऊन छान झोप लागते.

| Sakal

अंघोळ

झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे रिलॅक्स वाटतं. तणाव दूर झाल्यामुळे चांगली झोप येते.

| Sakal

दुपारीची वामकुक्षी

तुम्हाला रात्री झोप येत नसल्यास दुपारी वामकुक्षी घेण्याचा प्रयत्न करा. अशाने आठ तास झोपेची तुमची गरज पूर्ण होईल.

| Sakal

डिनरची वेळ

जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळा. झोपेची वेळ आणि डिनर यामध्ये दोन ते तीन तासांचे अंतर ठेवा. यामुळे फायदा होईल.

| Sakal

नशा टाळा

झोपण्यापूर्वी तंबाखू-सिगारेट, कॉफी किंवा दारू अशा नशेच्या पदार्थांचे सेवन करणे टाळा. या पदार्थांमुळे तुमची झोप डिस्टर्ब होते.

| Sakal

फोनचा वापर टाळा

झोपण्यापूर्वी स्मार्टफोनचा वापर करणए टाळा. यामुळे निद्रानाश होऊन डोळ्यांवर देखील विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो.

| Sakal