Pitru Paksha: टेस्टी अन् खुसखुशीत काकडीचे वडे, पहा रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

पितृपक्षाला तांदळाच्या खिरीसोबत उत्तम पर्याय म्हणजे काकडीचे वडे. आज आपण काकडीचे वडे कसे करायचे हे जाणून घेणार आहोत.

साहित्य: मोठी काकडी, गूळ, वेलची पावडर, तांदळाचे पीठ, बारीक रवा, मोहन- २ टेबलस्पून, मीठ- चिमूटभर, रिफाइंड तेल

काकडी किसून घ्या. त्यातील काकडीचा रस बाजूला काढा.त्यानंतर काकडीच्या रसात रवा साधारण १५ ते २० मिनिटे भिजत ठेवा.

गूळ आणि काकडी नॉन-स्टिक पॅनमध्ये एकत्रित मंद आचेवर शिजवा.

मिश्रणमध्ये वेलची पूड टाका आणि मिश्रण एकत्रिक करा. त्यानंतर तांदुळाचा पीठ घ्या आणि त्यावर मोहन टाकून एकत्र करा.

आता भिजवलेला रवा, तांदुळाचे पीठ, मीठ व काकडीचे मिश्रण एकत्र करा. सर्व एकत्र मळून घेऊन त्याचा गोळा बनवा.

गोळापासून छोटे छोटे गोळे बनवा आणि प्लॅस्टिकच्या पेपरला तेल लावत त्यावर तेलाच्या बोटांनीच वडा थापून घ्या.

तेल चांगले गरम करून घ्या त्यात वडे मध्यम आचेवर तळा.

हे वडे खिरीसोबत खुप टेस्टी वाटतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.