Recipe: सकाळी नाश्त्यात खा टेस्टी अन् हेल्दी पालकपूरी

| Sakal

पालक ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टीक आहे.

| Sakal

आज आपण पालकपासून तयार करण्यात येणारी पालक पुरीची रेसिपी जाणून घेणार आहोत. 

| Sakal

साहित्य - गव्हाचे पीठ, पालक, ओवा, आले, चवीनुसार मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, जिरे आणि तेल

| Sakal

उकळत्या पाण्यात पालक घाला आणि शिजू द्या. त्यानंतर पाण्यामधून पालक काढा आणि मिक्समधून पालकचे मिश्रण काढा.

| Sakal

त्यानंतर ओवा, आले, कांदा, टमाटर आणि मिरची पेस्ट होईपर्यंत मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

| Sakal

आता एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात वरील बारीक केलेले मिश्रण आणि पालक घाला. त्यात चवीनुसार तिखट, मीठ घाला.

| Sakal

कणिकमध्ये हे मिश्रण मिक्स करा आणि कणकीचा गोळा तयार करा. हा गोळा दहा मिनिटे बाजूला ठेवा.

| Sakal

या कणकीच्या गोळ्यापासून छोट्या छोट्या चपाती (पुरी)  तयार करा.

| Sakal

कढईत तेल गरम करा आणि त्यात या चपाती (पुरी) तळा.

| Sakal

ही पालकपुरी तुम्ही दही किंवा लोणचंसोबत खाऊ शकता.

| Sakal