Tulsi Benefits : तुळशीची पानं खाण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल

सकाळ डिजिटल टीम

तुळशी ब-याच आजारांसाठी उत्तम औषध आहे. आयुर्वेदमध्येही तुळशीला खूप महत्त्व आहे.

तुळशीला ‘क्वीन ऑफ हर्ब्स’ देखील म्हटलं जातं.

रोज दिवसातून एकदा जरी तुळशीची पाने चघळलीत किंवा पानांचा चहा करुन प्यायला तर त्यापासून तुमच्या शरीराला अनेक चांगले फायदे होऊ शकतात.

शरीरातील रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी तुळशीची पाने अधिक गुणकारी मानली जातात.

तुळस तापासाठी देखील उपयुक्त मानली जाते.

यासोबतच तुळशी, काळे मिरे आणि खडीसाखर मिसळून प्यायल्यानेही सर्दी-पडसे बरे होतात.

तुळस रक्त शुद्ध करून टॉक्सिनचे प्रमाण कमी करण्यास देखील मदत करतात.

तुळशीच्या पानात अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरीयल तत्व असल्यानेही या समस्या दूर होतात.

तुळशीच्या पानांचा रस प्यायलाने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

दातदुखी, हिरड्या किंवा दातांतून रक्त येणे ,दात किडणे यासाठी तुळशीची पाने औषध म्हणून काम करते.

तुळशीच्या पानांमध्ये अॅंटीस्ट्रेससारखे घटक उपलब्ध असतात.त्यामुळे तुळशी मानसिक तणावातून मुक्त करण्यासही मदत करते.

तुळशीची पाने खाल्लानेही डोकेदुखीला आराम मिळतो.

इन्फेक्शन, हदयरोग, अॅलर्जी, लठ्ठपणा, खोकला, त्वचारोग, दंतदुखी अशा अनेक त्रासांसाठी तुळशी खूप फायदेशीर आहे.

तुळस घरात असल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी तुळशीचं रोपटं असावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulsi Benefits | sakal