रोज हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे! Turmeric Water

Aishwarya Musale

उन्हाळा

उन्हाळ्याचा हंगाम येताच तुमची त्वचा चिकट आणि काळी पडू लागते. यामुळे पिंपल्स, मुरुम, टॅनिंग अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

turmeric water | sakal

ब्युटी प्रॉडक्ट्स

मग या समस्या टाळण्यासाठी तुम्ही विविध प्रकारची ब्युटी प्रॉडक्ट्स वापरता, पण त्यात केमिकल्स भरपूर प्रमाणात असतात, जे तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात.

turmeric water | sakal

हळदीचे पाणी

आज आम्ही तुम्हाला हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे सांगणार आहोत.

turmeric water | sakal

पिंपल्स

चेहऱ्यावर हळदीचे पाणी वापरल्याने पिंपल्स, काळे डाग, त्वचेची ॲलर्जी आणि टॅनिंग दूर होते.

turmeric water | sakal

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक

रोज झोपण्यापूर्वी हळदीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत होते. त्याचबरोबर चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते.

turmeric water | sakal

डाग दूर होतात

प्राचीन काळापासून वधूच्या लग्नाच्या वेळी हळदीचा समावेश केला जातो. चेहऱ्यावर हळदीच्या पाण्याचा वापर केल्यास डाग दूर होतात. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्याचा रंगही सुधारतो.

turmeric water | sakal

मुरुमांची समस्या दूर होते

हळदीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. रोज हळदीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरुमांची समस्या दूर होण्यास सुरुवात होते.

turmeric water | sakal

त्वचा

हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात, त्यामुळे जर तुम्ही त्वचेसाठी हळदीच्या पाण्याचा वापर केला तर तुम्हाला चेहऱ्यावरील चिडचिड आणि खाजेपासून सुटका मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

turmeric water | sakal