टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन (TV Celebrity Anushka Sen) नेहमीच तिच्या नवनवीन लूकनं सर्वांना आश्चर्यचकित करत असते.
अनुष्का सेननं अगदी लहान वयातच तिच्या टॅलेंटचा सर्वत्र प्रसार केलाय.
अलीकडंच, अभिनेत्रीनं सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
बालवीर फेम अनुष्का सेन आजकाल तिच्या सौंदर्यानं आणि ग्लॅमरस शैलीनं चाहत्यांना तिच्याकडं आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीय.
अलीकडंच अभिनेत्री अनुष्का सेननं तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंटरनेटवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री अनुष्का सेननं निळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला असून किलर लूक देणारी व्हाईट कलर पॅन्ट घालून फोटोशूट केलंय.
अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनुष्का सेनला इंस्टाग्रामवर 38.4 मिलियन लोक फॉलो करतात.