अनेकदा साडीवरील ब्लाउजच्या डिझाइन्स कोणत्या ठेवाव्यात, असा प्रश्न पडत असतो.
या काही हटके अन् फॅशनेबल डिझाइन्स तुम्हाला मदत करणार.
ब्लाउजची डिझाइन छान असेल तर साडी अंगावर उठून दिसते.
त्यामुळे बहूतेक महिला हटके ब्लाउजची डिझाइन शोधत असतात.
वेस्टर्न साडी असो की ट्रेडीशनल ब्लाउजची डिझाइनही ही नेहमीच साडीची शोभा वाढवते.
ब्लाउच्या डिझाईनमुळे फक्त साडीच नाही तर तुमची पर्सनॅलिटीही उठून दिसते.
आणि तुम्ही चार चौघात युनिक दिसता.
या सर्व डिझाइन्स बघून तुम्हीही तुमच्या मनाप्रमाणे ब्लाउजची डिझाईन करवून घेऊ शकता.
प्रत्येक साडीच्या डिझाईन आणि कापडावरही ब्लाउजची डिझाइन कशी असावी, असं ठरते.
म्हणजे कोणत्या प्रकारच्या साडीवर कोणती डिझाइन उठून दिसेल, हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते.
त्यासाठी तुम्ही अनेक बेवसाईट, युट्युबवरील व्हिडीओ किंवा गुगलवर सर्च करू शकता.
तुम्हाला एकापेक्षा एक भारी अन् हटके डिझाइन दिसून येईल.