उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्फी जावेद कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाहीये.
अतरंगी कपडे घालून उर्फी ही कायमच स्पाॅट होते. उर्फी जावेद हिची नवीन स्टाईल पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
नुकताच उर्फी जावेद हिचा अतरंगी स्टाईलमधील व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही काळ्या रंगाच्या मोनोकिनी टॉपमध्ये दिसत आहे. यासोबत उर्फीने पन्नीचा लॉन्ग स्कर्ट घातला आहे.
उर्फीचा हा आउटफिट हटके दिसतोय. यासोबत तिने मोठे कानातले घातले असून पांढऱ्या रंगाची हील्स घातली आहे.
टिका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देतानाही उर्फी बऱ्याच वेळा दिसते. काहीजण उर्फी जावेद हिचे काैतुकही करताना दिसतात.
उर्फीची फॅशन काही लोकांना अवडते. तर काही जण मात्र उर्फीच्या फॅशनच्या विरोधात असतात.
उर्फीने तिच्या करियरची सुरुवात छोट्या भूमिकांपासून केली. पण त्यामध्ये उर्फीला यश मिळालं नाही.