I am sorry ऋषभ पंत',उर्वशीचा क्रिकेटरला मेसेज

प्रणाली मोरे

ग्लॅम डॉल उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शाब्दिक चकमक सुरू आहे.

Esakal

दोघांनीही एकमेकांवर पोस्टच्या माध्यमातून ताशेरे ओढले होते. काही दिवसांपूर्वी तर उर्वशीनं क्रिकेटर ऋषभ पंतला छोटू भैय्या म्हणून खिजवलं होतं.

Esakal

एवढ्यावरच न थांबता तिनं त्याला रक्षाबंधनच्या शुभेच्छा देत,मी काही मुन्नी नाहीय डार्लिंग बाळा तुझ्यासाठी बदनाम व्हायला असं मुद्दामहून लिहिलं होतं.

Esakal

आता ऋषभ पंतनेही तिला 'माझा पाठलाग सोड बहिणी', असं म्हणत छेडलं होतं हे देखील उर्वशीच्या चिडण्याचं कारण होतंच.

Esakal

पण आता उर्वशीनं तिच्या लेटेस्ट मुलाखतीत ऋषभ पंतला चक्क सॉरी म्हटलं आहे. सध्या तिच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Esakal

मुलाखतकाराने ऋषभ पंतविषयी विचारताच आधी, 'सीधी बात नो बकवास' म्हणणारी उर्वशी अचानक तिचा Forgive & Forgot फंडा आठवताच पटकन हात जोडून म्हणाली,sorry...i am sorry.

Esakal

उर्वशीच्या या मुलाखतीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर आता लोक म्हणत आहेत,'अखेर झुकलीच', तर काही म्हणतायत,'गोलमाल है,सब गोलमाल है'.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal