कुणी काही का म्हणेना पण उर्वशीच्या त्या नव्या लूकनं चाहत्यांना भुरळ पडली आहे.
सोशल मीडियावर उर्वशी ही नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.
आता उर्वशी ही एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
उर्वशी सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
फॅशन जगतात देखील उर्वशीच्या व्हायरल होणाऱ्या लूक्सला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.
सोशल मीडियावर जशी ती लोकप्रिय आहे तसेच वेगवेगळ्या कारणामुळे ट्रोल होण्यातही उर्वशी आघाडीवर असते.
येत्या काळात उर्वशी ही टीव्ही मनोरंजन विश्व आणि चित्रपट क्षेत्रात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
उर्वशीला नेटकरी हे नेहमीच आघाडीचा क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या नावावरुन चिडवताना दिसतात.
उर्वशीला देखील त्याच्या नावावरुन चिडवणं यानं फारसा काही फरक पडत नसल्याचे दिसून आले आहे.