वैदेही परशुरामी देणार प्राजक्ता माळीला टक्कर

| Sakal

मराठी इंडस्ट्रीत वैदेही परशुरामी हे नाव आता सर्वांच्या ओळखीचं होऊ लागलं आहे. वैदेही दिसायला सुंदर आहेच पण आपल्या अभिनयानेही तिनं चाहत्यांचे मन जिंकले आहे.

| Sakal

वैदेही परशुरामीनं २०१० मध्ये महेश कोठारे यांच्या 'वेड लावी जीवा' या सिनेमातून अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

| Sakal

वैदेहीनं आपल्या कार्किर्दीत कोकणस्थ,वजीर,डॉ.काशिनाथ घाणेकर सारख्या बड्या स्टारकास्ट असलेल्या सिनेमांतून काम करत स्वतःला गुणी अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं.

| Sakal

वैदेही आता लवकरच छोट्या पडद्यावर एका कॉमेडी शो ची सूत्रसंचालिका म्हणून आपल्या समोर येणार आहे.

| Sakal

झी मराठी वरील प्रसिद्ध 'फू बाई फू' शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच कॉमेडी शो चं सूत्रसंचालन करताना आता वैदेही दिसणार आहे.

| Sakal

जेव्हापासून सोशल मीडियावर ही बातमी पोस्ट झाली तेव्हापासून चाहते म्हणू लागलेयत,आता प्राजक्ता माळीला कडवी टक्कर देणार वैदेही परशुरामी.

| Sakal

प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शो चं सूत्रसंचालन गेली अनेक वर्ष करते आहे. त्यामुळे आता वैदेहीची तुलना प्राजक्ता सोबत पावलोपावली होणार हे १०० टक्के.

| Sakal