छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन
स्वत:च्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर स्वत:ची बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.
'इश्किया', 'द डर्टी पिक्चर', 'कहानी' अशा चित्रपटांमध्ये तिने चौकटीबाहेरच्या भूमिका साकारल्या.
२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द डर्टी पिक्चर' (The Dirty Picture) या चित्रपटातून तिने तिच्या अभिनयकौशल्याची नवीन बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली.
बॉलिवूडमधील अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते.
१९९५ सालच्या हम पांच ह्या झी टीव्ही वरील विनोदी धारावाहिकामध्ये काम करून विद्याने अभिनयाची सुरुवात केली.
२००५ सालच्या परिणीता ह्या हिंदी चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.