Vinayaki Chaturthi : दगडूशेठ गणपतीला शेषनागाची पुष्पसजावट, बघा फोटो

धनश्री भावसार-बगाडे

शेषनागाची पुष्पसजावट

गणेश जयंतीनिमित्त 'दगडूशेठ' गणपती मंदिरात शेषनागाची पुष्पसजावट करण्यात आली होती.

Vinayaki Chaturthi | esakal

पाताळातील गणेश जन्म

गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाचे विलोभनीय रुप विराजमान झाले.

Vinayaki Chaturthi | esakal

भाविकांची गर्दी

मंदिरावर केलेली फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.

Vinayaki Chaturthi | esakal

शेषात्मज गणेश अवतार

याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता.

Vinayaki Chaturthi | esakal

फुलांची भव्य सजावट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभा-यासह प्रवेशद्वारावर शेषनागाच्या विविधरंगी फुलांची भव्य सजावट करण्यात आली होती.

Vinayaki Chaturthi | esakal

गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम

गणेश जयंतीनिमित्त मंदिरात ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक, पहाटे ४ वाजता गायक ऋषिकेश रानडे व सहकारी यांचे गायन, गणेश याग, सहस्त्रावर्तने असे धार्मिक विधी झाले.

Vinayaki Chaturthi | esakal

शेषात्मज अवतार जन्म

मायाकर राक्षसापासून वाचवण्यासाठी श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले.

Vinayaki Chaturthi | esakal

मूषक वाहन

याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले.

Vinayaki Chaturthi | esakal

श्रीमूषकग नाव

या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले.

Vinayaki Chaturthi | esakal

गाणपत्य संप्रदाय

गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayaki Chaturthi | esakal