Weight Loss साठी पोळी खावी की भात?

सकाळ डिजिटल टीम

लोकं वजन कमी करण्यासाठी काय काय नाही करत. जीमपासून डाएटपर्यंत सर्व पर्याय ट्राय करतात.

Weight Loss | esakal

सध्याच्या लाइफस्टाइलचा विचार करताना वजन आणि आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं.

Weight Loss | esakal

अशावेळी काही लोक पोळी खावी की, भात खावा की दोन्हीही बंद करावं या संभ्रमात असतात.

Weight Loss | esakal

पण खरंच पोळी किंवा भात सोडल्याने वजन कमी होतं का? मग यापैकी नेमकं काय सोडणं योग्य आहे जाणून घेऊया.

Weight Loss | esakal

यासंदर्भात आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, भात आणि पोळी दोन्हीही आपापल्या जागी फार महत्वपूर्ण आहेत.

Weight Loss | esakal

कोणतीही गोष्ट पूर्णपणे बंद करणे अजिबात फायद्याचे नसते.

Weight Loss | esakal

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आठवड्यातून ४ दिवस पोळी आणि २ दिवस भात खाऊ शकतात.

Weight Loss | esakal

भात आणि पोळीमधल्या पोषण तत्त्वांमध्ये फार फरक आहे. त्यामुळे त्याचे प्रमाण किती असावे हे ठरवणे गरजेचे असते.

Weight Loss | esakal

काही आहारतज्ज्ञ सांगतात की, गव्हाच्या पोळी ऐवजी नाचणी, ज्वारी, बाजरीची भाकरी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

Weight Loss | esakal

गव्हात ग्लूटन असतं तर भात ग्लूटन फ्री असतो. म्हणून डायबेटीसच्या लोकांनी भात कमी खावा तर ज्यांना ग्लूटनचा त्रास होतो त्यांनी पोळी कमी खावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight Loss | esakal