Chaitra Gauri : चैत्रगौरी म्हणजे काय अन् कशी साजरी करतात?

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीये पासून चैत्रगौर बसविली जाते. देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया(अक्षय्य तृतीये)पर्यंत तिची पूजा केली जाते.

chaitra gauri | sakal

चैत्रात येणाऱ्या सुंदर सुवासिक विविध रंगी फुलांची तसेच रांगोळ्यांनी सजावट करून देवीची खण व नारळ याने ओटी भरली जाते.

chaitra gauri | sakal

चैत्र महिन्यात मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला एक पारंपरिक सोहळा आहे. स्त्रिया आपापल्या घरी हा घरगुती समारोह साजरा करतात.

chaitra gauri | sakal

महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावतात.

chaitra gauri | sakal

चैत्र शुद्ध धर्मामध्ये चैत्र महिन्यात अंगणात तुळशी वृंदावनाजवळ जमीन गाईच्या शेणाने सारवून रांगोळ्या काढण्याची परंपरा आहे. या रांगोळ्यांना चैत्रांगण असे म्हणतात. हिंदू धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढल्या जातात.

chaitra gauri | sakal

चैत्रातील ही गौर म्हणजे पार्वतीचे माहेरघरी येणे होय.

chaitra gauri | sakal

झोपाळ्यावर बसलेल्या चैत्रगौरीचे अंकन केलेलं असते.

chaitra gauri | sakal

घरातील मुली व स्त्रिया हळदी कुंकू करतात त्यावेळी चैत्रगौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धतही काही ठिकाणी दिसून येते.

chaitra gauri | sakal

कैरी घालून वाटलेली हरबर्‍याची डाळ, कैरीचे पन्हे, टरबूज,कलिंगड यासारखी फळे सुद्धा गौरीसमोर ठेवली जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

chaitra gauri | sakal