राज्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.
आकाशात अवकाळी पावसाच्या ढगांची मळभ दाटली होती.
अखेरीस राज्यात अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला या अवकाळी पावसाचा फटका बसला
दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी अवकाळी पाऊस यामुळे ऐन ऊन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती मिळाली.
अवकाळी पाऊस म्हणजे काय? तो का पडतो हे आपण जाणून घेण्याता प्रयत्न करूया...
मान्सून किंवा मान्सूनपूर्व कालावधीव्यतिरिक्त इतर वेळी पाऊस पडतो
तेव्हा त्याला अवकाळी पाऊस असे म्हणतात.
हा चेतावणीशिवाय येतो आणि जेव्हा आपण त्याची किमान अपेक्षा करतो.
अनेकदा अवकाळी पावसासोबत गारपीट देखील होते, यामुळे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
अवकाळी पाऊस का पडतो, हे देखील जाणून घेऊया...
पाण्याच्या बाष्पीभवनाच्या वाढत्या प्रमाणामुळे अवकाळी पाऊस पडतो
चक्रीवादळे आणि गारपीट देखील मोठ्या प्रमाणात होते