लग्न ही एक मोठी आणि दीर्घकाळाची जबाबदारी असते. त्यामुळे हा निर्णय़ विचार करूनच घ्यायला हवा.
आई-वडिलांकडून मुलामुलींना लग्न करण्यासाठी तगादा लावला जातो. त्याला अनेकजण कंटाळतात.
अशावेळी काय करावं? आईबाबांना आपली लग्नाबद्दलची भूमिका कशी पटवून द्यायची?
लग्न या विषयाबद्दल पालकांनी आणि मुलांनी एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला हवं. नाहीतर वादाला तोंड फुटतं.
आपलं अफेअर असेल तर पालकांसमोर योग्य वेळी हा विषय मांडावा.
मोकळेपणाने संवाद नसेल तर लग्नासाठी मागे लागले म्हणून मुलं पालकांचा रागराग करू लागतात.
आत्ताच लग्न करायचं नसल्यास तसं स्पष्ट सांगावं आणि आपले पालक आपलं मत विचारात घेतील असा, विश्वास पालकांवर ठेवणं गरजेचं आहे.
पालकांच्या किंवा नातेवाईकांच्या दबावाखाली येऊन निर्णय घेणे टाळावे.
लग्नाळू अपत्यांनी खुल्या मनाने मोठ्यांना समजेल अशा शब्दात आपली बाजू मांडावी लागेल .