लग्नाआधी होणाऱ्या जोडीदारासोबत काय बोलावे?

सकाळ डिजिटल टीम

लग्नाआधी ज्या व्यक्तीला तुम्ही तुमचा जीवनसाथी बनवण्याचा विचार करत आहात त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी.

Phone Call | Sakal

पण जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी काय बोलावे हे समजत नसेल, तर खाली नमूद केलेले मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही तुमचे बोलणे सुरू करू शकता.

Phone Call | Sakal

जर तुमचे लग्न जुळले असेल तर 'लग्न का करत आहेस, कसला दबाव नाही ना' हा प्रश्न आपल्या जोडीदाराला सर्वात आधी विचारा. तुम्हाला त्यांचे मत तर कळेलच, पण त्या व्यक्तीला असे वाटेल की तुम्हाला त्यांची काळजी आहे. तुमचे संभाषण पुढे जाण्यास मदत होईल.

Phone Call | Sakal

तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराला त्याच्या आवडी-निवडीबद्दल विचारा, तसंच तुमच्या आवडी-निवडीबद्दल सांगा.

Phone Call | Sakal

अनेक मुलींना लग्नानंतरही करिअर करायचं असतं, त्यामुळे फोनवर बोलताना तुम्हाला तुमच्या पार्टनरला त्यांच्या करिअरबद्दल विचारावंच लागतं. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी या विषयावर बोलाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराची स्वप्ने आणि ध्येये काय आहेत हे कळू शकेल.

Phone Call | Sakal

लग्नानंतरचे आयुष्य कसे असेलयाबाबत एकदा बोला आणि जर त्याची काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण असे केल्याने तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण करू शकाल.

Phone Call | Sakal

अरेंज्ड मॅरेजमध्ये, जेव्हा तुम्हाला लग्नापूर्वी फोनवर बोलण्याची संधी मिळते, तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Phone Call | Sakal

कारण मित्र बनल्याने तुमच्या दोघांमधील अंतर थोडे कमी होईल आणि तुम्हाला एकमेकांसोबत थोडे कम्फर्टेबल वाटेल. तुमच्या जोडीदाराशी मैत्री केल्याने, तुम्ही तुमच्या भावना त्यांच्यासमोर बिनधास्तपणे व्यक्त करू शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone Call | Sakal