सतीश कौशिक हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते. 2018 मध्ये त्यांनी जवळपास २३ किलो वजन कमी केले होते.
जास्त वजनामुळे त्यांना खूप त्रास होत होता. एक वेळ अशी आली होती की त्यांना चालायला त्रास होऊ लागला.
या सगळ्यांमुळे सतीश यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता.
पण सतीश यांनी जीममध्ये जाऊन घाम गाळून वजन कमी केले नाही, तर डाएट प्लॅन योग्य पद्धतीने फॉलो करून वजन कमी केले होते.
अमेरिकेतील क्रिश्चियशन या डॉक्टरने सतीश कौशिक यांना वजन कमी करण्यास मदत केली होती.
त्यांनी सुचवलेल्या आहाराचे पालन करून सतीश यांनी जिममध्ये न जाता वजन कमी केले होते.
सतीश यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते वजन कमी करणारे एक औषध खात होते.
सतत हसणारे आणि हसवणारे सतीश कौशिक यांची अचानक एक्झिट सगळ्यांच्याच जिव्हारी लागली आहे.