भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची पत्नी जया भारद्वाज सध्या चर्चेत आहे.
एका व्यवसायाच्या नावाखाली जयाची 10 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलीये. जयानं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे माजी व्यवस्थापक कमलेश पारीख यांच्यावर या फसवणुकीचा आरोप केलाय.
या फसवणूक प्रकरणांमध्येच जया भारद्वाजचे सुंदर फोटोही व्हायरल होत आहेत.
दीपक चहरनं गेल्या वर्षी जूनमध्ये जया भारद्वाजसोबत लग्न केलं होतं. लग्नापूर्वी दोघंही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते.
जयाचे इन्स्टाग्रामवर 167 हजार फॉलोअर्स आहेत. जया खूपच ग्लॅमरस आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये.
लग्नाआधी जया दिल्ली एनसीआरमधील एका कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करत होती. जया दिल्लीची रहिवासी आहे.
जयानं दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून शिक्षण घेतलं. यानंतर ती मुंबईला शिफ्ट झाली. इथून तिनं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. जया मास कम्युनिकेशनची पदवीधर आहे.
जया ही बिग बॉस फेम सिद्धार्थ भारद्वाजची बहीण देखील आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 मध्ये दीपक चहरनं दुबई इंटरनॅशनल स्टेडियमच्या स्टँडमध्ये सर्वांसमोर जयाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.