काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चा 60 धावांनी पराभव केला.
या मध्ये तारा नॉरिसने दिल्लीकडून खेळताना आणि महिला प्रीमियर लीगमध्ये प्रथमच 5 विकेट्स घेतल्या आहेत.
ताराने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीने दहशत निर्माण करत पहिल्या दोन षटकात 4 बळी घेण्याचा पराक्रम केला.
ताराने केवळ चार षटकांत केवळ 29 धावा देत 5 बळी घेतले.
तारा नॉरिस ही 24 वर्षांची एक अमेरिकन खेळाडू आहे.
डावखुरी वेगवान गोलंदाज नॉरिसला DC ने लिलावात १० लाख रुपयांना विकत घेतले आणि ती महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रातील असोसिएटेड नेशन्समधील ती एकमेव खेळाडू आहे.
या लीगमध्ये सहभागी होणारी ती अमेरिकेतील एकमेव खेळाडू आहे.
पदार्पणाच्या सामन्यात तिने केलेली कामगिरी उल्लेखणीय आहे.
ताराकडे आता संपुर्ण स्पर्धेदरम्यान क्रिकेटप्रेमींच्या नजरा असणार आहेत.