वयाची तिशी गाठल्यानंतर आरोग्याच्या इतर समस्यांसोबतच केसगळतीचीही समस्या निर्माण होते.
केस पातळ होत जातात व टक्कल दिसू लागते.
तिशीनंतर केस पातळ होतात, पांढरे होतात. केसांची टोके कोरडी होतात.
वयानुसार केसांमधील मेलेनिन कमी होत जाते. त्यामुळे केस पांढरे होतात.
वैद्यकीय चाचणी करून हार्मोनल बदल, पोषक तत्त्वांची कमतरता यांविषयी जाणून घ्या.
आपल्या आहारात अ, ब, क, ड, इ जीवनसत्त्वांसह सेलेनियम, मॅग्नेशिअम आणि लोहाचा समावेश करा. ताणतणावापासून दूर राहा.
हीट स्टायलिंग ट्रीटमेंट्स टाळा.
डॉक्टरने दिलेलीच सौंदर्य उत्पादने वापरा.