रतनगड हा किल्ला रतनवाडीपासून ६ किलोमीटर अंतरावर, भंडारदरापासून २३ किमी, पुणे पासून १८३ किमी आणि मुंबईपासून १९७ किमी अंतरावर आहे.
अहमदनगर जिल्ह्यात हा किल्ला येतो
रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे.
हा किल्ला ४२५० फुट उंचीवर आहे. रतनगडचा किल्ला, ४०० वर्षांपूर्वीचा किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता.
किल्ल्याला गणेश, हनुमान, कोकण आणि त्र्यंबक हे चार प्रवेशद्वार आहेत
किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सामरद या गावातून पुढे दीड ते दोन किमी अंतरावर ,भंडारदरा भागाच्या पश्चिम बाजूला संदन दरी आहे.पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर इथे गर्दी असते.