आपल्याला विरूद्ध लिंगाचे कायम आकर्षण असते असे म्हटले जाते.
संपत्ती, हुद्दा, हुशारी, हे सगळे नंतर कळते पण सगळ्यात आधी कोणत्याही व्यक्तीचे डोळे सगळे काही सांगतात मग ते स्त्री चे असोत वा पुरुषाचे.
तेव्हा स्त्रीयांचीसुद्धा प्रथम नजर ही पुरुषांच्या डोळ्यांवरच असते.
म्हणून बहुतेक लोकांचे लक्ष पुरुषांच्या डोळ्यांकडे जात असते. करण डोळे हेच तुमच्या आतल्या स्वभावाचे खास प्रतिनिधित्व करतात.
काही लोकांचे डोळे भिरभिरत असतात, काहींचे चोरटी नजर इकडे तिकडे टाकत असतात, काहींचे छद्मी, उपहासात्मक नजरेचे असतात.
त्यावरून स्त्रीया पुरुषांचा स्वभावगुण ओळखतात.
एवढेच नव्हे तर त्यांचा स्त्रीयांच्या वागणूकीबाबत दर्जा कसा असेल हे सुद्धा स्त्रीया पुरुषांच्या डोळ्यांवरून ओळखता.