पुरुषांच्या अशा काही समान सवयी असतात ज्या महिलांना आवडत नाहीत. काही पुरुष अपवाद असू शकतात.
मुलांसमोर, चारचौघात उलट बोलणे,पाणउतारा करणे कुत्सित हसणे वगैरे कुठल्याच स्त्रीला आवडत नाही.
दुसर्या स्त्रीची तारीफ करणे,तिच्याकडे टक लावून बघणे, कारण नसताना बोलणे तसेच मैत्रीणी आल्यावर घुटमळत राहणे असल्या सवयी महीलांना आवडत नाहीत.
स्वयंपाक होईपर्यंत धीर नसणे,स्वयंपाक घरात विनाकारण लुडबुड करणे. माहेरच्यांविषयी टिंगल टवाळीत, शेलक्या भाषेत नेहमीच बोलणे.
मित्रांबरोबर जास्त वेळ घालविणे, संध्याकाळी उशिरापर्यंत बाहेर राहणे किंवा संध्याकाळी घराबाहेर पडणे, मित्रांना नेहमी नेहमी घरी बोलावणे.
सतत मोबाईल वर बीझी असणे. कुणाचा फोन आला तर बाहेर जाऊन हलक्या आवाजात संभाषण करणे.
बायकोला बाहेर कुठे जायचे असेल तर बरोबर कुणालातरी घेउन जा, अविश्वास दाखविणे. तुला एकटीला जमेल काय असा नेहमीचा सुर लावून नेभळट समजणे.
वेळेच्या वेळेस त्यांना समज देऊन काही गोष्टी सांगण्यास कुचराई करणे मग एखाद दिवस सगळ्यांनाच फैलावर घेत बायकोलाच जबाबदार धरणे.
काहीजण पैशांचा हिशोब मागतात, किवा स्वतः उधळपट्टी करून बायकोला छळतात.