प्रत्येक वाहनाला नंबर प्लेट असते जो आरटीओ कार्यालयांतर्गत वाहनांना दिला जातो, ज्यासाठी काही रुपये आकारले जातात.
पण काही नंबर प्लेट कोट्यलधींना विकल्या जातात आज आपण अशाच एका नंबर प्लेटबद्दल जाणून घेणार आहोत.
मोस्ट नोबल नंबरचा दुबईमध्ये लिलाव झाला, ज्यामध्ये अनेक नंबर लाखो कोटींना विकले गेले आहेत.
या लिलावात P7 नंबर प्लेट सर्वाधिक किंमतीला विकली गेली आहे.
या नंबर प्लेटची किंमत इतकी आहे की, मुंबईतील पॉश आणि महागज्या भागात कोट्यवधींचा फ्लॅटही तुम्हाला या किंमतीत खरेदी करता येईल.
दुबईतील झालेल्या लिलावादरम्यान, कारची नंबर प्लेट P7 विक्रमी 55 दशलक्ष दिरहम म्हणजेच सुमारे 1,22,61,44,700 रुपयांना विकली गेली.
चांगली बाब म्हणजे या लिलावातील सर्व पैसे हे 'वन बिलियन मील्स' मोहिमेसाठी सुपूर्द केले जातील, ज्याची स्थापना जागतिक उपासमारीचा सामना करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती.