वुमन्स र्पीमियर लीग (WPL)चे फायनल आज (२६ मार्च) रोजी मुंबईच्या ब्रैबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळलं जाणार आहे.
वुमन्स आयपीएलचं ही पहिलीच वेळ असून ही स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्या आणि उपविजेत्या संघाला मोठं बक्षिस दिलं जाणार आहे.
WPL 2023 मध्ये विजेत्या आणि उपविजेत्या संघासोबतच तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाला देखील बक्षिस मिळेल.
WPL 2023 चा कप उंचवणाऱ्या संघाला ६ कोटी रुपये मिळणार असून फायनलमध्ये पराभव झालेल्या संघाला ३ कोटी रुपये मिळतील.
चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहाणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बगळूरूआणि गुजरात जायंट्स या संघाना बक्षिस मिळणार नाहीये.
आयपीएलप्रमाणेच डब्लूपीएल मध्ये देखील ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेत्यांना बक्षिसं दिली जातील.
यासोबतच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आणि प्लेयर ऑफ द टूर्नांमेंट यांना देखील मोठी बक्षिसं मिळतील.
फायनल मॅचमध्ये प्लेयर ऑफ द मॅच खेळाडूला देखील १० लाख रुपये बक्षिस मिळणार आहे.