वीमेंस प्रीमीयर लीग (WPL) म्हणजेच महिला आयपीएल मध्ये सहभागी झालेल्या अनेक महिला खेळाडूंच्या सौंदर्याची चर्चा देखील जोरात होते आहे.
या यादीमध्ये एलिस पेरीचं नाव यादीत खूप वर येतं..
एलिस पेरी ही ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू आहे, तसेच ती WPLमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू टीमकडून खेळते आहे.
WPL साठी झालेल्या ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाची स्टार ऑलराउंडर एलिस पेरीली आरसीबीने १.७ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं.
क्रिकेट सोबतच एलिस पेरी नेहमी तिच्या सुंदरता आणि ग्लॅमरस लुकमुळे देखील चर्चेत असते.
एलिस पेरी सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय आहे, वेळोवेळी तीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
एलिसचे इंस्टाग्रामवर तब्बल १० लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
३२ वर्ष वय असलेली एलिस पेरी तिच्या फिटनेससाठी देखील फेमस आहे.
एलिस जगातील एकमेव खेळाडू आहे जी आयसीस क्रिकेट वर्ल्डकप सोबतच फुटबॉलच्या फीफा वर्ल्डकपमध्ये देखील सहभागी झाली आहे
एलिसने ऑस्ट्रेलियासाठी १० टेस्ट, १३१ वनडे आणि १३९ टी२० मॅट खेळल्या आहेत.