उद्धव ठाकरे होणार का महाराष्ट्राचे जगनमोहन रेड्डी ? - YS Jagan Mohan Reddy

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राच्या राजकारण उद्धव ठाकरे यांच्यासोबत घडलेल्या राजकीय परिस्थितीची तुलना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत करण्यात येत आहे. 

YS Jagan Mohan Reddy story

ही तुलना का करण्यात येत आहे? जगनमोहन रेड्डी यांची राजकीय कारकीर्द उद्धव ठाकरेंसाठी फायद्याची कशी हे आपण समजून घेऊया.

YS Jagan Mohan Reddy story

यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. जगनमोहन रेड्डी यांचे वडील वाय.एस. राजशेखर रेड्डी २००४ ते २००९ या कालावधीत आंध्र प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री होते.

YS Jagan Mohan Reddy story

राजशेखर रेड्डी काँग्रेसमध्ये मोठं नेतृत्व होते. राजशेखर रेड्डी म्हणजे आंध्रातील काँग्रेस अशी चर्चा होत होती. २००९ मध्ये, ते कडप्पा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.

YS Jagan Mohan Reddy story

२ सप्टेंबर २००९ मध्ये राजशेखर रेड्डी यांचे निधन झाले. यानंतर खरं राजकारण सुरू झालं. जगनमोहन रेड्डी यांनी वडिलांचा राजकीय वाकसा पुढे नेण्याचे ठरवले. 

YS Jagan Mohan Reddy story

आमदारांनी जगमोहन रेड्डी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यास अनुकूलता दर्शवली. मात्र काँग्रेसच्या हे जिव्हारी लागले. या निवडिला सोनिया आणि राहुल गांधी यांनी मान्यता दिली नाही.

YS Jagan Mohan Reddy story

यानंतर जगमोहन रेड्डी यांनी संपूर्ण राज्यात शोक यात्रा काढली. या यात्रेला देखील काँग्रेसने विरोध केला. यात्रा थांबवण्याचे आदेश दिले. मात्र जगमोहन थांबले नाहीत. 

YS Jagan Mohan Reddy story

काँग्रेसचे आदेश धुडकावल्यामुळे हायकमांड आणि जगमोहन यांच्यात संघर्ष निर्माण झाला. वैयक्तिक बाब असल्याचे सांगून त्यांनी यात्रा पुढे नेली.

YS Jagan Mohan Reddy story

वडिल गेले, काँग्रेस पक्ष गेला आता जगमोहन काय निर्णय घेणार याकडे सर्वांते लक्ष होते. त्यांना मोठी सहानुभूती मिळाली होती. 

YS Jagan Mohan Reddy story

२९ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांनी कडप्पा लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला आणि पक्ष सोडला. त्यांची आई विजयम्मा यांनीही पुलिवेंदुला विधानसभा मतदारसंघातून राजीनामा दिला आहे आणि पक्षही सोडला आहे.

YS Jagan Mohan Reddy story

त्यांनी ७ डिसेंबर २०१० रोजी पुलिवेंडुला येथून घोषणा केली की तो ४५ दिवसांत एक नवीन पक्ष सुरू करणार आहे. 

YS Jagan Mohan Reddy story

मार्च २०११ मध्ये, त्यांनी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील जगगाम्पेटा येथे वायएसआर काँग्रेस पार्टी या नावाने नवीन पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा केली. 

YS Jagan Mohan Reddy story

नंतर, त्यांच्या पक्षाने कडप्पा जिल्ह्यात पोटनिवडणुकीत प्रवेश घेतला आणि जवळजवळ सर्व जागा प्रचंड बहुमताने जिंकल्या. 

YS Jagan Mohan Reddy story

जगनमोहन रेड्डी YSR काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून, कडप्पा मतदारसंघातून पोटनिवडणुकीला सामोरे गेले आणि ५,४५,०४३ मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले. 

YS Jagan Mohan Reddy story

जगनमोहन रेड्डी यांच्या आईने वाय.एस. विवेकानंद रेड्डी यांच्या विरुद्ध पुलिवेंदुला विधानसभा मतदारसंघात ८५,१९३ मतांनी विजय मिळवला.

YS Jagan Mohan Reddy story

त्यानंतर ते थांबले नाहीत. एप्रिल आणि मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत, YSR काँग्रेस पक्षाने बाजी मारली 

YS Jagan Mohan Reddy story

आंध्र प्रदेशमधील एकूण १७५ विधानसभा जागांपैकी १५१ आणि लोकसभेच्या २५ जागांपैकी २२ जागा जिंकल्या. त्यांनी ३० मे २०१९ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YS Jagan Mohan Reddy story