माय फॅशन : ‘ट्रेंड्सची माहिती नक्की घेत राहा’

फॅशन नेहमीच बदलत असते. तिच्यामध्ये अनेक प्रकार येतात. ट्रेंडमध्ये अनेक गोष्टी अचानक येतात. मात्र, सध्या जो ट्रेंड आहे, तो आपल्याला सूट होत असेल तर नक्की फॉलो करावा.
aetasha sansgiri
aetasha sansgirisakal
Summary

फॅशन नेहमीच बदलत असते. तिच्यामध्ये अनेक प्रकार येतात. ट्रेंडमध्ये अनेक गोष्टी अचानक येतात. मात्र, सध्या जो ट्रेंड आहे, तो आपल्याला सूट होत असेल तर नक्की फॉलो करावा.

- एतशा संझगिरी

कपड्यांचा माझा सर्वांत आवडता प्रकार म्हणजे एक सिंपल लेगिन आणि त्यावर कॉटनची कुर्ती होय. कानामध्ये झुमके आणि पायात मोजड्या. माझ्या चेहऱ्याला जे चांगलं दिसतं आणि मला जे कम्फर्टेबल वाटतं, त्याच गोष्टी मी परिधान करते. फॅशन करताना आपल्याला जे सूट होईल, ज्यातून आत्मविश्वास वाढेल, आपल्याला कम्फर्टेबल वाटेल असे कपड्यांचे प्रकार निवडावेत. कारण, आपण जे कपडे परिधान करतो, त्यावरून आपाले हावभाव व्यक्त होत असतात. आपण कम्फर्टेबल नसू, तर ते समोरच्या लोकांच्या लगेच लक्षात येतं.

फॅशन नेहमीच बदलत असते. तिच्यामध्ये अनेक प्रकार येतात. ट्रेंडमध्ये अनेक गोष्टी अचानक येतात. मात्र, सध्या जो ट्रेंड आहे, तो आपल्याला सूट होत असेल तर नक्की फॉलो करावा. अन्यथा सूट होत नसेल, तर त्याचा वापर अजिबात करू नये.  रंगांची निवड करायला काही क्रायटेरिया नाही. कारण, सगळ्या स्किन टोन्सना सगळेच रंग छान दिसतात. अर्थात, कधीकधी एखादा रंगातील शेड आपल्याला मॅच होत नाही, हे मी मानते; पण एकुणात सगळे रंग सगळ्यांना सूट होतात. ज्या रंगांचे कपडे आपण घालतो, तो आपल्याला आवडलेला असतो अन् यातून आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कधीकधी आपल्याला एखादा रंग आवडत नाही, मात्र आपल्यावर तो खूप छान दिसत असतो. मला गुलाबी रंग आवडत नाही; मात्र या रंगांचे कपडे घातल्यानंतर अनेकांनी माझी स्तुतीच केली आहे. त्यामुळे सर्वांनी सर्वच रंगांचे कपडे घालावेत.

मी सध्या सोनी टीव्हीवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारत आहे. या ऐतिहासिक भूमिकेमुळे मला फॅशन करताना खूप काळजी घ्यावी लागते. माझे फॅशन आयकॉन अनेकजण आहेत. कारण, मला सर्वच प्रकारचे कपडे परिधान करायला आवडतात. एक सुंदर पैठणी, गजरा व ठसठशीत टिकलीपासून बौंबर जॅकेट आणि डिस्ट्रेज जीन्स व क्लोज शूजही घालायला आवडतं. छान गाऊन आणि हिल्सही घालायला आवडतात. ज्याला जे आवडते अन् ते ती गोष्ट कॅरी करू शकतात, ते माझे फॅशन आयकॉन होतात. त्यामुळे ती व्यक्ती कुणीही असू शकते. मला एखाद्या कार्यक्रमात चांगले ड्रेस घातलेली व्यक्ती आवडली, की ती माझ्यासाठी फॅशन आयकॉन होते.

एक फॅशनफंडा सगळ्यांनीच पाळायला हवा तो म्हणजे सगळ्या ड्रेसवरती सगळी आभूषणं घालणं खूप चुकीचं आहे, असं मला वाटतं. काही ड्रेसवर मोठे नेकलेस किंवा कानात काहीच नाही किंवा छोटेसे टॉप छान दिसतात. काही ड्रेसवर मोठे झुमके किंवा स्टेटमेंट कानातले आणि गळ्यात काहीच नाही असंही छान दिसतं. कधीकधी कानात, गळ्यात काहीच नाही आणि हातात फक्त एक घड्याळ किंवा कडं घातलं तर तेही खूप छान दिसतं.

फॅशन टिप्स

  • फॅशन करताना कम्फर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे.

  • नवीन फॅशन ट्राय करून पाहा. वेगवेगळ्या फॅशन करून पाहा. त्यातून आपल्याला काय छान दिसतं, हे समजू शकेल.

  • ‘लेस इज मोअर’ ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कमीत कमी गोष्टींमधूनही आपण खूप छान दिसून जातो.

  • एखादा ट्रेंड सुरू आहे म्हणून तो लगेच फॉलो करू नका. कारण तो आपापल्या सूट होत नसेल, तर त्याचा काही उपयोग होत नाही.

  • तुमच्या शरीरयष्टीला समजून घेऊन त्यानुसार कपड्यांची आणि फॅशनची निवड करा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com