आरोग्यसखी : मेंदूची ‘चेक लिस्ट’

आपल्या मेंदूला आपण जेवढा व्यायाम देऊ, तेवढा तो सुदृढ राहणार आहे. कोडी सोडवणं, वाद्य वाजवणं, नवी भाषा शिकणं हे खूप चांगले छंद आहेत.
Brain
BrainSakal
Summary

आपल्या मेंदूला आपण जेवढा व्यायाम देऊ, तेवढा तो सुदृढ राहणार आहे. कोडी सोडवणं, वाद्य वाजवणं, नवी भाषा शिकणं हे खूप चांगले छंद आहेत.

- अपर्णा दीक्षित, मानसोपचारतज्ज्ञ

आपल्या मेंदूला आपण जेवढा व्यायाम देऊ, तेवढा तो सुदृढ राहणार आहे. कोडी सोडवणं, वाद्य वाजवणं, नवी भाषा शिकणं हे खूप चांगले छंद आहेत.

‘आजकाल ना मला फार विसरायला होतं,’ हे वाक्य मला माझी सत्तरीमधली आई, चाळिशीमधली माझी मैत्रीण आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारी एक २० वर्षांची युवती अशा तिघींनी ऐकवलं आहे. का असं होतंय, की आपली स्मरणशक्ती आपल्याला दगा देते? काहीतरी महत्त्वाचं राहून जातं, काहीतरी शुल्लक आठवत नाहीये म्हणून चिडचिड होते? आणि आपण काय करायला पाहिजे यावर उपाय?

बऱ्याचदा आपला प्रॉब्लेम गोष्टी ‘लक्षात राहत नाहीत’ (problem of retention) हा नसून, आपले ध्यान कुठंतरी दुसरीकडे असतं (problem of attention) हा असतो. बऱ्याच गोष्टी आपण पुरेसं लक्ष दिलं नाही म्हणून विसरून जातो. घरातून बाहेर पडताना दार लावलं का नाही? किल्ली घेतली का नाही? या गोष्टी का विसरल्या जातात- कारण त्या करताना आपलं ध्यान कुठंतरी दुसरीकडे असतं. त्यामुळे आपण आपलं ध्यान जी गोष्ट करत आहोत त्यावर ठेवलं, तर स्मरणशक्तीचे बरेच प्रॉब्लेम सुटतील.

काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी त्याला काहीतरी संदर्भ जोडणं आवश्यक असतं. जसं की मी जर एका नवीन व्यक्तीला भेटले. ‘सुमेधा’ हे नाव मला लक्षात ठेवायचं असेल, तर मी असं म्हणीन, की ‘माझी मैत्रीण आहे ना मेधा तिच्या आधी सु लावलं की झालं सुमेधा.’ एक डॉक्टर मला भेटले. त्यांचं नाव वैद्य होतं. तर मी असं लक्षात ठेवलं, की ‘ते डॉक्टर ज्यांचं नाव संस्कृतमध्ये डॉक्टर आहे.’... जरा गमतिशीर आहेत ही उदाहरणं; पण तुम्हाला कल्पना आली असेल मला काय म्हणायचं आहे. संदर्भांची पिवळी sticky note गोष्टीवर लावली, की ती गोष्ट मेंदूच्या खूप गोष्टींच्या ढिगाऱ्यामधून पटकन् सापडते.

एक चांगली युक्ती आहे, की रात्रीच आपल्या उद्याच्या कामांची यादी बनवून ठेवणं. आपला मेंदू त्याच गोष्टी लक्षात ठेवतो, ज्यावर आपण मेहनत घेतलेली असते. त्यामुळे मेंदू त्या गोष्टी नक्की लक्षात ठेवतो- ज्या आपण विचार- लिखाण - वाचन या तिन्ही टप्पांमधून पार केल्या आहेत. पण फक्त विचार केलेल्या गोष्टी विसरल्या जातात. डॉ. अतुल गोवंडे त्यांच्या checklist manisfesto पुस्तकात म्हणतात, ‘माणसाच्या स्मरणशक्ती आणि ध्यान दोन्ही गोष्टी बिन भरवशाच्या असल्याने chechlist वापरा.’

आपली working memory एका वेळेला ५ ते ९ गोष्टी एकत्र ठेवून आठवू शकते. लास्ट time कधी आपण आपल्या working memory ची परीक्षा घेतली? नाही ना आठवत? म्हणूनच अधूनमधून फोन, calculator बाजूला ठेवून बुद्धीला ताण देऊ या. मग बघू कशा गोष्टी नाही लक्षात राहत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com