पालकत्व निभावताना... : पसारा आवरताना...

आशिष तागडे
Sunday, 10 May 2020

‘आई गं, आज चमचमीत खायचा मूड आहे, जरा काही करतीस का?’’ स्वप्नाच्या रात्री साडेदहा वाजता आलेल्या या ऑफरने सीमाला हसावं की काय करावं हेच समजेना. ‘‘अगं, आताच नऊ वाजता तर आपण पोटभर जेवण केलं ना? तास-दीड तासात कशी काय भूक लागते. जेवणानंतर भूक लागण्यासाठी काय काम केलेस. मोबाईल तर खेळते आहेस..’’

‘आई गं, आज चमचमीत खायचा मूड आहे, जरा काही करतीस का?’’ स्वप्नाच्या रात्री साडेदहा वाजता आलेल्या या ऑफरने सीमाला हसावं की काय करावं हेच समजेना. ‘‘अगं, आताच नऊ वाजता तर आपण पोटभर जेवण केलं ना? तास-दीड तासात कशी काय भूक लागते. जेवणानंतर भूक लागण्यासाठी काय काम केलेस. मोबाईल तर खेळते आहेस..’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आईच्या या जबरदस्त फायरिंगमुळं स्वप्नाबरोबर तिचे बाबाही शांत झाले. लॉकडाउनमुळं सीमाचा अधिकाधिक वेळ स्वयंपाकघरातच जात होता. ऑफिस परवडलं, पण घर नको अशा मनःस्थितीत सीमा आली होती. एक मात्र झालं, सकाळ आणि सायंकाळी घरातील सर्वजण एकत्र बसून जेवण करत असल्यानं छान गप्पा होत होत्या. सीमानं स्वप्नाच्या प्रश्‍नाला उत्तर देऊन वेळ मारून नेली असली, तर तिच्या मनात या प्रश्नानं विचारचक्र सुरू झालं. दिवसभर काही विशेष काम नसल्यानं स्वप्नालाच, काय घरातील सर्वांनाच निश्‍चितच कंटाळा येत असणार. आपलेच उदाहरण पाहता, ऑफिस आणि घर अशी तारेवरची कसरत आपण किती लिलया करत होतो. आता घराकडं लक्ष देता येत असलं, तरी तीच तीच कामे करून कंटाळा आला आहे. आता स्वप्नाकडून स्वावलंबनाचे धडे नीटपणे गिरवून घेतले पाहिजेत.

त्यासाठी अजून वेळ गेलेली नाही. काही दिवस हातात आहेत, असा विचार करून सीमानं एक प्लॅन आखला आणि ती झोपायला गेली.

सीमा सकाळी लवकर उठली. तिनं नवऱ्यालाही उठवलं. बेडरूममधील माळा आवरण्यास तिनं सुरुवात केली. आई-बाबांच्या आवरण्याच्या आवाजानं स्वप्नाही जागी झाली. सीमानं तिला फ्रेश व्हायला सांगितलं आणि तिची रूम आवरण्याबाबत सूचना केली. आई-बाबा आवराआवर करतात हे पाहून स्वप्नानं काही न बोलता आपली रूम आवरायला घेतली. बेडरूम आवरत असताना अनेक न लागणाऱ्या वस्तू आपल्याकडं असल्याचं सीमाच्या व तिच्या नवऱ्याच्या लक्षात आलं. मॉलमध्ये गेल्यावर केवळ चकचकीत दिसणाऱ्या वस्तू घेतल्याचंही त्याच्या लक्षात आलं. इकडं स्वप्नाचीही हीच अवस्था होती. केवळ हौस म्हणून तिनं हट्टानं अनेक गोष्टी घेतल्या होत्या.
‘‘आई गं, आता मला या गोष्टी लागत नाही. काय करायचं याचं,’’ हा प्रश्‍न तिनं स्वाभाविकपणे विचारला.

सीमा नेमकी याच प्रश्‍नाची वाट पाहत होती. ती म्हणाली, ‘‘तुला त्याचवेळी सांगितलं होतं, पण तुम्हा बाप-लेकीसमोर माझं काही चालतं का? अगं, या पुढील काळात खरंच गरज असेल तरच ती वस्तू घ्यायची हे ठरवा आणि ती काळाची गरज आहे.’’ सीमा स्वप्नाशी बोलत असली, तरी त्याचा रोख आपल्याकडेच आहे, हे तिच्या नवऱ्याच्या लक्षात आलं होतं. त्यालाही हे मनोमनी जाणवले की, अनेक वस्तू वापराविना पडून आहेत. आता या वस्तूंचं काय करायचं हा प्रश्‍न बाप-लेकींसमोर होता. तो सीमानं चुटकीसरसा सोडविला. चांगल्या वस्तूंची यादी करायला सांगून त्या एका समाजसेवी संस्थेला देण्याचं सांगितलं. तसा संबंधित संस्थेच्या संचालकांना फोन करून लॉकडाउन संपल्यावर घेऊन जाण्याबाबतही सांगितलं. घरात राहून आईला कामाचा किती व्याप असतो. हे एव्हाना स्वप्नाच्या लक्षात आलं होतं. घर सांभाळणं इतकं सोप्पं नाही.. आई खूप काय काय करत असते, ही जाणीवही तिला झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Aashish Tagade on Parenting