esakal | माझ्या स्वप्नांनाही तिने दिले पंख 
sakal

बोलून बातमी शोधा

reshma-shinde

मी शाळेत असताना नृत्य अन् नाटक या गोष्टीसाठी मला संधी मिळाली नाही. मात्र, मी ज्यावेळी कॉलेजला गेले, त्यावेळी एका डान्स ग्रुपमध्ये सहभागी झाले. मात्र, आईने मला अभिनय आणि नाटकात काम कर, असा सल्ला दिला. 

माझ्या स्वप्नांनाही तिने दिले पंख 

sakal_logo
By
रेश्मा शिंदे, अभिनेत्री

आईबद्दल किती बोलावं तेवढं थोडंच आहे. माझी आई उषा खूपच साधी. घर, संसार, सासू-सासरे अन् मुलांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करायचा, हेच तिचं विश्व होतं. मी लहान असताना टीव्ही बघताना टीव्हीमधल्या कलाकारांचा अभिनय बघून तसाच अभिनय करायचे. त्यावेळी आजी म्हणायची, ‘ही हिरोईन होणार.’ मात्र, मी चार-पाच वर्षांची असताना आजी गेली; पण ते स्वप्न माझ्या आईनं बघितलं. 

मी शाळेत असताना नृत्य अन् नाटक या गोष्टीसाठी मला संधी मिळाली नाही. मात्र, मी ज्यावेळी कॉलेजला गेले, त्यावेळी एका डान्स ग्रुपमध्ये सहभागी झाले. मात्र, आईने मला अभिनय आणि नाटकात काम कर, असा सल्ला दिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमाची जाहिरात टीव्हीवर झळकली. आईने त्यातील नंबर आपल्या डायरीमध्ये लिहून घेतले. मला निरोप पाठवून कॉलेजमधून लवकर यायला सांगितले. मी घरी गेल्यानंतर तिने या प्रोग्रॅमबाबत सर्व गोष्टी सांगितल्या. त्यानुसार मी तयारी केली आणि ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोच्या ऑडिशनसाठी गेले. एक-एक करत यामध्ये माझी निवड होत गेली. 

दरम्यान, मी एकटीच मुलगी असल्यामुळे डॉक्टर, इंजिनीयर किंवा टीचर व्हावे, अशी माझ्या कुटुंबातील सर्वांची आणि बाबांची इच्छा होती. मात्र, आईनं त्यांना समजावून सांगितलं अन् माझ्या कलागुणांना प्रोत्साहन देत गेली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मला पहिली मालिका मिळाली ‘बंध रेशमा’चे. त्यानंतर ‘विवाह बंधन’, ‘लगोरी’, ‘नांदा सौख्यभरे’ आदी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. त्यानंतर ‘चाहूल’ या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. या मालिकेचे दोन भाग करण्यात आले. ‘चाहूल एक’मध्ये मी नायिका, तर ‘चाहूल २’मध्ये मी खलनायिकेची भूमिका साकारली. त्याचबरोबर मी कलर्स वाहिनीवर ‘केशरीनंदन’ हा हिंदी शो केला होता. त्याला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात माझी मारवाडी वेगळी भाषा होती. ती प्रेक्षकांना खूपच भावली. 

आता मी ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. खरंतर ही भूमिका खूपच भन्नाट आहे. या मालिकेमुळे मी घराघरात दीपा म्हणून पोचले. या भूमिकेमुळंच मला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. अनेकांना तर आपल्या डोळ्यातील अश्रूही आवरता आले नाहीत. माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे, ज्यावेळी ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मध्ये माझी निवड झाली तो. कारण, त्यावेळी मला नृत्य म्हणजे काय, हे माहीत नव्हते; पण माझ्यातील कलागुणांनी स्टेजवर मला साथ दिली. ज्यावेळी मी टीव्हीवर आले, त्यावेळी आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिला खूप आनंद झाला होता. त्या काळात फारसे मोबाईल नव्हते. तरीही आईनं मला मोबाईल घेऊन दिला. माझ्यासाठी फोटोशूटही करून घेतले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खरंतर आईनं माझयासाठी स्वप्न बघणं अन् ते पूर्ण होताना पाहणं ही गोष्ट मला साध्य करता आली. हाच माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. 

(शब्दांकन : अरुण सुर्वे)