सेलिब्रिटी वीकएण्ड : लॉंग ड्राईव्हची मजा.... 

सायली पाटील, अभिनेत्री
Friday, 14 August 2020

सायली पाटीलने ‘कृतांत’ आणि ‘बॉईज-२’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या सायलीला अभिनयाची आवड आहे. ती आपल्या वीकेण्डबद्दल सांगते, ‘‘लाँग ड्राईव्हला जाणे, हॉटेलात खाणे आणि मस्तपैकी फिरणे हाच माझा शनिवारी किंवा रविवारी उद्योग. मित्रमंडळी व फॅमिलीबरोबर मी फिरते. आमच्या घरी रविवारी संध्याकाळी जेवणात काही तरी स्पेशल असते.

सायली पाटीलने ‘कृतांत’ आणि ‘बॉईज-२’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या सायलीला अभिनयाची आवड आहे. ती आपल्या वीकेण्डबद्दल सांगते, ‘‘लाँग ड्राईव्हला जाणे, हॉटेलात खाणे आणि मस्तपैकी फिरणे हाच माझा शनिवारी किंवा रविवारी उद्योग. मित्रमंडळी व फॅमिलीबरोबर मी फिरते. आमच्या घरी रविवारी संध्याकाळी जेवणात काही तरी स्पेशल असते. त्यामध्ये कधी कधी चिकन लॉलीपॉक, चिकन तंदुरी, पिझ्झा असतो. हे पदार्थ मी स्वतः करते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी मांसाहारच असतो. नेहमीच्या वेळेनुसार उठायचे आणि आठवड्यातील राहिलेली कामे रविवारी उरकून घ्यायची. सकाळी नाश्ता किंवा दुपारी जेवण नेहमीसारखेच, मात्र रात्री स्पेशल असते. मी, आई-बाबा व छोटा भाऊ रविवारी ‘ओटीटी’वर एखादी वेबसीरीज किंवा चित्रपट पाहतो.’’ विकएण्डच्या इतर गोष्टांबद्दल ती सांगतो, ‘‘माझी मित्रमंडळीही खूप आहेत. इंजिनिअरिंगचे मित्र-मैत्रिणी भेटल्यावर वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होतात. काही जुन्या आठवणींना आम्ही उजाळा देतो. मात्र चित्रपटसृष्टीशी संबंधित मित्रमंडळी भेटल्यावर एखादी मालिका, त्यातील कोणाचे काम उत्तम आहे, नवे नाटक कोणते आले आहे, कोणता चित्रपट चालतो आहे आणि येणारा कोणता यांवर गप्पा रंगतात. माझी वेबसीरीजची प्रोड्युसर मैत्रीण शलाका पाटील भेटल्यावर खूप गप्पा रंगतात. ती मला टिप्स देते, खूप माहिती मिळते.’’

‘मला शॉपिंगची आवड नाही. नातेवाईकांमध्ये लग्न असल्यास शॉपिंगला जाते. वाचनाची फारशी आवड नाही, परंतु चित्रपटाच्या सेटवर अनेक गझल व कविता खूप वाचल्या आहेत. कुणाचा बर्थ डे असल्यास हॉटेलात जाऊनच साजरा करतो, मात्र इतरवेळी घरच्याच जेवणाला प्राधान्य देतो,’’ असे सायली सांगते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article celebrity weekend sayali patil