esakal | अशी राखा केसांची निगा!
sakal

बोलून बातमी शोधा

Hair-Care

उन्हाळ्यात केसांची स्वच्छता अत्यंत आवश्‍यक आहे. केस हे मानवी सौंदर्याचा आरसा आहे. केसांची स्वच्छता केली की, केस सुरक्षित राहतात. डोक्‍यावरील त्वचेचे संरक्षण होते. केसांच्या स्वच्छतेसाठी काही शाम्पू आहेत. त्यांचासुद्धा वापर करावा. समतोल आहार घ्यावा.
- डॉ. रचना संपतकुमार

अशी राखा केसांची निगा!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. अशावेळी शरीराला घाम खूप येतो. या कालावधीत सर्व वयोगटातील लोकांना पिंपल्ससारखे केसतुडे तयार होत असतात. केसतुड्यांची ही समस्या लहान मुले, ज्येष्ठ व्यक्तींमध्ये विशेष आढळते. या कालावधीत त्वचा तेलकट बनलेली असते. ज्यांना मधुमेह आहे, त्यांच्यामध्ये प्रामुख्याने केसतुड्यांची ही समस्या उद्भवते. घामामुळे डोक्‍याला खाज सुटते. अगदी केसांच्या मुळापर्यंत घाम झिरपत असेल किंवा केसांची स्वच्छता नसेल तर फंगल इन्फेक्‍शन होते. बुरशीमुळे केस गळतात. जखमा होतात. डोक्‍यावरील त्वचा खराब होते. हे टाळता येऊ शकते. त्यासाठी पुढील बाबींची आवर्जून काळजी घ्या.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे आवर्जून करा

  • कोणताही ऋतू असू दे, आठवड्यातून दोन-तीन वेळा केस स्वच्छ धुवावेत.
  • आवळा, शिकेकाई यांचा उपयोग करून केस धुतल्यास फायदा होतो.
  • आंघोळीनंतर केस पूर्ण कोरडे करावेत, त्यामध्ये पाणी राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • केसात कोंडा तयार होऊन खाज सुटते. अशा वेळी चांगल्या दर्जाचा अँटीडॅन्ड्रफ शाम्पू वापरून केस धुवावेत.
  • शक्‍यतो पी. एच. (पी. एच. म्हणजे हायड्रोजनचे प्रमाण किंवा कारकता) 5.5 असलेल्या शाम्पूने केस धुवावेत. त्यामुळे तेलकटपणा, धूळ निघून केस साफ होण्यास मदत होते.
  • विनाकारण तेल लावू नये, केसांना मसाज कमी करावा. तेलामुळे धूळ चिकटून राहते.
  • केस डाय करणाऱ्यांनी उन्हात फिरताना टोपी, स्कार्फ वापरून केसांचे संरक्षण करावे.

असा घ्या आहार

  • आहारामध्ये आंबे, कलिंगडे, द्राक्षे असे भरपूर पाणी असलेली तशीच अन्य हंगामी फळे घ्यावीत.
  • आंबे, द्राक्षांमध्ये व्हिॅटॅमिन "सी'' असते. त्याचा केसांच्या वाढीसाठी आणि संवर्धनासाठी चांगला उपयोग होतो.
  • आवळ्याचा उपयोग आहारामध्ये जरूर करावा.