किचन गॅजेट्स : फोल्डेबल मॅजिक बास्केट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Foldable Magic Basket

अनेकदा पदार्थ तळणं ही बाब जिकिरीची असते. उदाहरणार्थ, जेव्हा बॉबी किंवा फ्रेंच फ्राइजसारखे छोटे छोटे घटक खूप मोठ्या प्रमाणात तळायचे असतात, तेव्हा फक्त झाऱ्यानं ते तळणं शक्य होत नाही.

किचन गॅजेट्स : फोल्डेबल मॅजिक बास्केट

अनेकदा पदार्थ तळणं ही बाब जिकिरीची असते. उदाहरणार्थ, जेव्हा बॉबी किंवा फ्रेंच फ्राइजसारखे छोटे छोटे घटक खूप मोठ्या प्रमाणात तळायचे असतात, तेव्हा फक्त झाऱ्यानं ते तळणं शक्य होत नाही. तळलेल्या तेलातून तळले गेलेले घटक झाऱ्यानं बाहेर काढणं अवघड असतं. अशा वेळी तेल अंगावर उडू शकतं. यासाठी फोल्डेबल मॅजिक बास्केट नावाचं खास गॅजेट उपयोगी पडतं. याचा वापर करून पदार्थ तळणं अगदी सोपं पडतं. फक्त एवढंच नाही, तर भाज्या, फळं धुणं, काही पदार्थ स्टीम करणं अशा अनेक कामंही करता येतात. ही बास्केट फोल्ड करता येणारी असल्यामुळे काम आणखी सोपं होतं. उपयोग झाल्यावर पाहिजे तेव्हा ती फोल्ड करून ठेवू शकता.

मॅजिक बास्केटची वैशिष्ट्ये

  • पदार्थ तळण्याचं काम सोपं करते

  • फ्रेंच फ्राइज, वेफर्स करण्यासाठी उत्तम

  • भाज्या, फळं धुणं, स्टीम करणं किंवा स्टोअर करणंही शक्य

  • पाहिजे तेव्हा फोल्ड करून ठेवता येते, त्यामुळे जागाही वाचते

  • उत्तम दर्जाच्या स्टेनलेस स्टीलपासून तयार झाली असल्यामुळे तेलाच्या तापमानाचा काही परिणाम होत नाही.

  • स्वच्छ करणं सोपं

  • तळण्याचं काम अधिक सुरक्षितपणे होतं.

टॅग्स :kitchenarticle