किचन गॅजेट्स : टी इन्फ्युझर

सकाळच्या चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. चहा कोणत्याही प्रकारचा असो- त्यात वापरली जाणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा पत्ती.
tea infuser
tea infusersakal
Summary

सकाळच्या चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. चहा कोणत्याही प्रकारचा असो- त्यात वापरली जाणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा पत्ती.

सकाळच्या चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. चहा कोणत्याही प्रकारचा असो- त्यात वापरली जाणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा पत्ती. पारंपरिक पद्धतीने चहा बनवताना वेळ बराच खर्ची होतो. त्याला पर्याय म्हणून बाजारात टी बॅग्जचा पर्यायही उपलब्ध आहे; परंतु त्यात टी बॅगमध्ये जेवढी चहापत्ती असेल तेवढ्याच प्रमाणात ती वापरता येते. ‘स्ट्रॉंग’ चहा हवा असल्यास पुन्हा नव्यानं टी बॅग चहाच्या कपात बुडवावी लागते. ही सगळी कंटाळवाणी प्रक्रिया स्टेनलेस स्टील स्टिक इन्फ्युझर मुळे टाळता येऊ शकते. गृहिणींसाठी टी इन्फ्युझरचा पर्याय अतिशय उपयोगी ठरतो.

टी इन्फ्युझरची वैशिष्ट्ये

  • टी बॉल इन्फ्युझर, स्टिक इन्फ्युझर, सिलिकॉन टी इन्फ्युझर अशा विविध प्रकारांत बाजारात उपलब्ध आहे. त्यापैकी स्टिक इन्फ्युझर या प्रकारात त्याच्या तळाशी छिद्रे असतात. सिलेंड्रिकल शेपच्या आत चहाची पाने टाकावी. त्यानंतर चहाच्या कप, ग्लास किंवा मग मध्ये चहापत्तीने भरलेली स्टिक ठेवावी. त्यांनंतर त्यात गरम पाणी टाकावे. दोन ते तीन मिनिटांनंतर त्यात साखर आणि दूध किंवा आवडीप्रमाणे लिंबू घालून चहाचा आस्वाद घेता येतो.

  • चहा जितका स्ट्रॉंग हवा असेल, त्याप्रमाणे चहापत्तीचे प्रमाण कमी जास्त करता येते. त्यामुळे टी बॅगच्या तुलनेत टी इन्फ्युझरचा वापर प्रभावी ठरतो.

  • टी इन्फ्युझर वापरण्यास सोपे असून स्टेनलेस स्टीलच्या गुळगुळगुळीत पृष्ठभागामुळे काही सेकंदांतच स्वच्छ करता येते.

  • यात असणाऱ्या छिद्रांमुळे, चहाची पाने चांगली पद्धतीने भिजतात तसेच त्यांना फुलण्यासाठी जागा मिळते म्हणून उत्तम प्रकारे चहा तयार होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com