मेमॉयर्स : स्रोत प्रेरणेचा अन् ऊर्जेचा

नम्रता गायकवाड, अभिनेत्री
Saturday, 5 September 2020

माझी आई कलाप्रेमी आहे. त्याचा फायदा मला माझ्या करिअरमध्ये झाला. शालेय शिक्षण घेत असताना ती मला स्नेहसंमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा देत असे. त्याचप्रमाणे तिने भरतनाट्यमचे क्लासही लावले. माझ्या मावसबहिणी खूप छान नृत्य करत होत्या. त्यामुळे मलाही नृत्यामध्ये गोडी लागली. माझे बाबा वीज कंपनीमध्ये नोकरी करत होते. त्यावेळी त्यांच्या ऑफिसने नाटक आणि एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

माझी आई कलाप्रेमी आहे. त्याचा फायदा मला माझ्या करिअरमध्ये झाला. शालेय शिक्षण घेत असताना ती मला स्नेहसंमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा देत असे. त्याचप्रमाणे तिने भरतनाट्यमचे क्लासही लावले. माझ्या मावसबहिणी खूप छान नृत्य करत होत्या. त्यामुळे मलाही नृत्यामध्ये गोडी लागली. माझे बाबा वीज कंपनीमध्ये नोकरी करत होते. त्यावेळी त्यांच्या ऑफिसने नाटक आणि एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचे परीक्षण अशोक समेळ करत होते. त्यांची भेट झाली, त्यावेळी त्यांनी मला तुझ्यासारख्या पर्सनॅलिटीची गरज आहे, त्यामुळे तू अभिनयात काम कर, असा सल्ला दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर मी माझ्या मित्र-मैत्रिणी यांना विचारणा केली, तर त्यांनी नको जाऊ या क्षेत्रात असे सांगितले; पण आईने मला अभिनयाची कार्यशाळा जॉईन करण्यास सांगितली. त्यानुसार मी तेथे गेले. माझ्याकडून वाचन आणि वर्कआउट करून घेतले. मला ते खूपच आवडले. मला नवीन काहीतरी शिकायला मिळाले. त्यामुळे मी अभिनयात येण्याचा निर्णय घेतला. बाबा खूपच कडक स्वाभावाचे; पण त्यावेळी आईने मला पाठबळ दिले. त्यामुळेच मी मराठी आणि साऊथमधील चित्रपटांत काम करू शकले. माझ्यातील गुण आईने ओळखले, त्यामुळे मी या क्षेत्रात आले. नाहीतर दुसऱ्या क्षेत्रात असते. 

आजही शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक मला स्नेहसंमेलनमधील फोटोज पाठवतात, त्यावेळी खूप आनंद होतो. आईचे आणि माझे बॉंडिंग मैत्रीसारखे आहे. तिने मला स्वातंत्र्य दिले, त्यामुळे मी आज कोणत्याही क्षेत्रात हिरीरीने काम करू शकते. साऊथमध्ये काम करण्यासाठी आईनेच मला पाठिंबा दिला. लॉकडाऊनच्या काळात अनेक प्रकारच्या रेसिपी आईने मला बनवण्यास शिकवल्या. तिने आतापर्यंत शंभर नव्हे, तर हजारपटीने कर्तव्य बजावले आहे. त्यामुळेच मला बळ मिळाले. ‘मंगळसूत्र’ या मालिकेत अलका कुबल यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली अन् ती माझी पहिली मालिका होती, त्यावेळी आईने मला पाठिंबा दिला. ‘स्वराज्य’ या माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून मी मोठ्या पडद्यावर झळकले, त्यावेळी सर्वांनाच खूप आनंद झाला. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केले अन् खूप प्रोजेक्ट आहेत, ते केवळ आईने पाठबळ दिल्यामुळेच. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article namrata gaikwad on mother