किचन + : नॉनस्टिक मास्टर पॅन

Non-Stick-Master-Pan
Non-Stick-Master-Pan

कुटुंब छोटे असल्यास किंवा बॅचलर्ससाठी स्वयंपाकाची भांडी आणि त्यांचा मोठा पसारा कटकटीचा ठरतो. अर्थात, प्रत्येक पदार्थ करण्यासाठी वेगळे भांडे लागत असल्याने त्याला पर्यायही नसतो. वरण-भात करण्यासाठी कुकर, पोळ्यांसाठी तवा, भाजीसाठी कढई आणि पिझ्झा, बर्गरसारख्या वेगळ्या रेसिपी करायच्या असल्यास ही यादी आणखीनच वाढते. हे पदार्थ करण्यापेक्षा ते झाल्यानंतर भांडी स्वच्छ करणे हा मोठा व्याप असतो. त्यात एकाच वेळी अनेक पदार्थ बनवायचे असल्यास अंगावर काटाच येतो. यासाठी नॉनस्टिक मास्टर पॅन हा भन्नाट प्रकार बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही एकाच वेळी अनेक पदार्थ शिजवणे, भाजणे आणि ग्रिल करण्यासारख्या अनेक गोष्टी करु शकता.

या पॅनमधील एका कप्प्यात तुम्ही पिझ्झा करु शकता, दुसऱ्या राजम्याच्या भाजी करू शकता, त्याचबरोबर तुम्हाला हवे असलेले सलाड ग्रीलही करू शकता. एकच पॅन आणि तोही एकाच बर्नरवर ठेवून गरम करता येत असल्याने तुमच्या गॅसची बचत होते, अनेक भांडी वापरावी लागत नाही व कच पॅन धुण्याचे काम उरते आणि स्वयंपाक बनवण्यासाठी लागणारा वेळही कमी होतो.

असा आहे नॉनस्टिक मास्टर पॅन

  • पॅनला पाच कंपार्टमेंट असल्याने एकाच वेळी पाच विविध पदार्थ बनवता येतात.
  • पॅनचा विशिष्ट मेटल बेस उष्णता सर्वत्र व्यवस्थित परसवत असल्याने एकच बर्नर वापरून पदार्थ छान शिजतात.
  • नॉनस्टिक पॅनमुळे पदार्थ चिकटत नाही व त्यांचा दर्जाही उत्तम राहतो. 
  • हा पॅन ३५० सेल्सिअम तापमानापर्यंत ओव्हन सेफ आहे. 
  • डिश वॉशरमध्ये किंवा गरम पाण्याखाली धरल्यास स्वच्छ होतो.  स्वच्छ करायला सोपा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com