फॅशन + : लेदर स्कर्ट

leather skirt
leather skirt

प्रत्येक मुलीच्या वॉडरोबमध्ये काही ट्रेंडिंग कपडे असलेच पाहिजेत. शिवाय फॅशनमधील काही प्रकार कधीच जुने होत नाहीत. काही वर्षांनी त्यांची फॅशन पुन्हा येते. त्यालाच आपण ‘एव्हरग्रीन’ फॅशन असेही म्हणतो. असाच स्कर्टमधील एक प्रकार म्हणजे ‘लेदर स्कर्ट’. बऱ्याच वर्षांपूर्वी याची फॅशन आपण पाहिली, मग पुन्हा २०००मधील चित्रपटांमधून ती पुढे आली. आता डेनिमच्या काळातही लेदर मागे पडलेले नाही. जाणून घेऊया सध्याच्या ट्रेंडींग लेदर स्कर्टविषयी...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लेदर स्कर्ट फॅशनमधील सर्वांत क्लासी आणि तितकाच अनोखा स्कर्ट आहे. कोणत्याही प्रकारची डिझाईन नसतानाही प्लेन लेदर स्कर्ट तुम्हाला स्टाईलिश लुक देतो. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये, चित्रपटांमध्ये किंवा सेलिब्रिटींना हा स्कर्ट परिधान करताना आपण अनेकदा पाहिले आहे. आता पुन्हा एकदा त्याची फॅशन आली असून, तुम्ही त्याचा वापर सहजरीत्या करू शकता.

1) लेदर स्कर्टवर कोणत्याही प्रकारचे जॅकेट घालणे टाळा. 
2) ऊन आणि उष्ण वातावरणामध्ये हा स्कर्ट घालणे शक्यतो टाळा.
3) कॉलेज, ऑफिस, पार्टी, आउटिंग, कार्यक्रम, शॉपिंग अशा अनेक ठिकाणी हा स्कर्ट उत्तम पर्याय ठरेल. 
4) जास्त अॅक्सेसरीज न घालता फक्त नाजूक नेकलेस लुक पूर्ण करण्यास मदत करेल. गोल्डपेक्षा सिल्व्हर अॅक्सेसरीजला प्राधान्य द्या.
5) चपलेचा रंग निवडतानाही काळा किंवा न्यूड रंग योग्य ठरतील. बेलिज, स्निकर्स, लेस अप फ्लॅट्स आणि हिल्समध्ये पेन्सिल हिल्स, बूट्स, प्लॅटफॉर्म हिल्स असे काही पर्याय आहेत. 

डिझाईन 
लेदर स्कर्टच्या प्रकारांमध्ये प्रामुख्याने पेन्सिल, प्लेटेड आणि सर्कलचा समावेश आहे. पेन्सिल आणि प्लेटेड स्कर्ट गुडघ्यापर्यंत, म्हणजेच मिडी या प्रकारात येतात. तो हायवेस्ट आणि कमेरला घट्ट असून, लांबी गुडघ्यापर्यंत असते. यामध्ये पुढे किंवा मागे स्लिट असणारी किंवा बटणे असणारी स्टाईलदेखील मिळते. बॉडीकोन किंवा प्लेडेट याप्रकारांमध्ये कमी उंचीचा, मिनी स्कर्टही पाहायला मिळेल. 

रंग
इतर कोणत्याही साधारण स्कर्टप्रमाणे लेदरमध्ये तुम्हाला भडक आणि भरपूर रंग मिळणार नाहीत. काळा, तपकिरी, हिरवा, लाल असे काही मर्यादित रंग पाहायला मिळतात. त्यामधील काळा रंग लोकप्रिय आहे. इतर रंगापेक्षा लेदरमध्ये काळा क्लासिक लुक देण्यास मदत करतो. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे कापड पाहायला मिळते. एक ग्लॉसी आणि दुसरे मॅट. ग्लॉसी कापड चमकणारे आणि प्लॅस्टिकप्रमाणे असते. पेन्सिल स्कर्ट घट्ट असल्याने टॉप सैलसर निवडा. प्लेटेड किंवा शॉर्ट स्कर्टवर फिटींगचा टॉप घालू शकता. लेदर स्कर्टवर जवळजवळ कोणत्याही रंगाचा टॉप घालता येईल. मात्र, स्कर्टची उंची, प्रसंग आणि ठिकाण त्यानुसार टॉपची निवड करावी.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com