ऑन डिफरंट ट्रॅक : ...कुछ नया ट्राय करते है!

शिल्पा परांडेकर
Sunday, 12 July 2020

विविध ठिकाणाचे, विविध पदार्थ चाखणे हा काहीजणांचा प्रिय छंद. ‘आज कुछ नया ट्राय करते है,’ असा विचार येताच आपण गूगल किंवा फूड ब्लॉगजवरून क्युझिन, मेन्यू यांची माहिती घेतो. सध्या फूड ब्लॉगिंगचे आणि स्वतःला ‘फूडी’ म्हणवून घेण्याचे पेवच फुटले आहे! ‘केवळ छान फोटो किंवा व्हिडिओ बनविले आणि चार चांगले शब्द लिहिले म्हणजे फूड ब्लॉगिंग होत नाही.

नाव - सादिया खान
गाव - पुणे
व्यवसाय - फूड ब्लॉगर, मॉडेल
वय - २१ वर्षे

विविध ठिकाणाचे, विविध पदार्थ चाखणे हा काहीजणांचा प्रिय छंद. ‘आज कुछ नया ट्राय करते है,’ असा विचार येताच आपण गूगल किंवा फूड ब्लॉगजवरून क्युझिन, मेन्यू यांची माहिती घेतो. सध्या फूड ब्लॉगिंगचे आणि स्वतःला ‘फूडी’ म्हणवून घेण्याचे पेवच फुटले आहे! ‘केवळ छान फोटो किंवा व्हिडिओ बनविले आणि चार चांगले शब्द लिहिले म्हणजे फूड ब्लॉगिंग होत नाही. तुम्हाला त्या क्युझिनविषयी, पदार्थाविषयी, त्यात घातलेल्या जिन्नसांविषयी योग्य माहिती असली पाहिजे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपला प्रामाणिक अभिप्राय तेथील शेफ व संबंधितांना स्पष्ट सांगता आला पाहिजे.’ फूड ब्लॉगर सादिया खानसोबत तिच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या ‘फूड’ या विषयावर गप्पा मारण्याचा व हे अनोखे क्षेत्र जाणून घेण्याचा योग आला. नवनवीन पदार्थ बनविणे, चाखणे व त्याविषयी सोशल मीडियावरती लिहिणे हा तिचा लहानपणापासूनचा आवडीचा उद्योग. गेल्या दोन वर्षांत तिने अडीचशेहून अधिक रेस्टॉरंटसाठी फूड ब्लॉगिंग केले आहे. याचबरोबर इंस्टाग्राम, फेसबूक, झोमॅटो अशाप्रकारांच्या सोशल मीडियांच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या फूडबाबत खवय्य्यांना ती मार्गदर्शन करत असते.

मात्र इथवरचा तिचा प्रवास सोपा नव्हता. ती मूळची सौदी अरेबियातील. जिथे मुलींनी केवळ ‘चूल आणि मुल’च करावे, अशी धारणा असणारे पालक व समाज. अशातच आपलेही नाव असावे, समाजासाठी आपणही काहीतरी करावे या ध्यासाने तिने पुणे गाठले. एकीकडे पालक व नातेवाइकांचा प्रखर विरोध, तर दुसऱ्या बाजूला नवा प्रांत, नवी भाषा, नवे लोक. एकाचवेळी अशा सर्व संकटांवर मात करत ती आज यशस्वी फूड ब्लॉगर, मॉडेल, निवेदिका, समाजसेविका व आणखीही बऱ्याच भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहे.

समाजातील पीडित महिलांसाठी तिने व तिच्या सहकाऱ्यांनी ‘तथ्या’ ही सामाजिक संस्था उभारली आहे. इतक्या कामी वयात आलेली प्रगल्भता, विविध क्षेत्रांत तिचा असणारा वावर हा नक्कीच भारावून टाकणारा आहे. ‘फूड मेरे लिए मेरी लाईफ है. इसने मुझे पहचान दी है,’ असे ती स्पष्ट करते. तिची फूडविषयीची असलेली नितांत आवड तिच्या ‘फूड पोस्ट’मधून झळकते. या पोस्ट पाहून अस्सल खवय्य्यांची पावले त्याठिकाणी नक्कीच वळत असतील, यात शंका नाही. तेव्हा आपणांसही कधी ‘आज कुछ नया ट्राय करते है,’ असा मूड झाल्यास सर्वप्रथम सादियाच्या पेजला आवर्जून भेट द्या.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shilpa parandekar on sadia khan