esakal | फॅशन पॅशन : ट्रान्सपरंट छत्री आणि रेनकोट
sakal

बोलून बातमी शोधा

Fashion

पावसाळ्यात तुम्ही कितीही चांगले कपडे घाला, ते कपडे रेनकोट तसेच छत्रीमुळे झाकले जातात. ट्रान्सपरंट छत्रीला क्लिअर छत्री असेही म्हटले जाते. अशा ट्रान्सपरंट छत्रीमध्ये अनेक अभिनेत्रींना स्पॉट करण्यात आले आहे.

फॅशन पॅशन : ट्रान्सपरंट छत्री आणि रेनकोट

sakal_logo
By
सुवर्णा येनपुरे-कामठे

फॅशन पावसाळ्यात तुम्ही कितीही चांगले कपडे घाला, ते कपडे रेनकोट तसेच छत्रीमुळे झाकले जातात. ट्रान्सपरंट छत्रीला क्लिअर छत्री असेही म्हटले जाते. अशा ट्रान्सपरंट छत्रीमध्ये अनेक अभिनेत्रींना स्पॉट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गाडीतून उतरताना अपेक्षित स्थळी जाताना त्या अशा प्रकारची छत्री वापरण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे लुकही झाकला जात नाही. यावर फ्लॉवर प्रिंट, बॉर्डर, हलक्या हार्टच्या किंवा छत्रीच्या एकाच भागावर असलेल्या चित्रे अशा प्रिंटच्या छत्र्यादेखील पाहायला मिळतात. थ्री फोल्डिंगच्या छत्र्या वापरण्याचा एक काळ होता. कारण त्या बॅगेत सहज मावत होत्या. मात्र आता अशा ट्रान्सपरंट छत्र्या या एकाच फोल्डच्या म्हणजेच लांब असतात. या जुन्या पद्धतीच्या पण नवीन ढंगाच्या छत्र्या पुन्हा ट्रेंड होत आहेत. 

या गोष्टी नक्की करा.... 

  • पावसाळ्यात मुळातच आपल्याला डार्क किंवा न्युड रंगाचे कपडे वापरण्याची संधी असते. रंगेबिरंगी कपडे पावसाळ्यात छान आणि उठून दिसतात. 
  • अनेक मुली या दुचाकीने प्रवास करत असल्याने ट्रान्सपरंट छत्री वापरणे सोयीचे नाही. याचसाठी ट्रान्सपरंट रेनकोटचा पर्याय तुमच्यासाठी अगदी योग्य असेल. 
  • रंगेबिरंगी कपड्यांवर हा रेनकोट घातल्याने एकप्रकारची चकाकी आल्यासारखे पाहणाऱ्याला वाटते, तसेच तुमचा मूळ लुक रेनकोटमुळे झाकलाही जात नाही. 
  • शॉर्ट्सवर लांब रेनकोटही छान उठून दिसतो. यामध्ये फ्लॉवर प्रिंट आणि बॉर्डर असलेले रेनकोट मिळतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही रेनकोट निवडू शकता. 
  • ट्रान्सपरंट रेनकोटचा आणखी एक फायदा म्हणजे, इतर रंगाचे रेनकोट घातल्याने तुमच्या स्टाईलमधील तोच तो पण दिसून येतो. पण त्याचजागी ट्रान्सपरंट रेनकोटला कोणताच रंग नसल्याने तो आपण घातलेल्या कपड्यांना हायलाईट करत असतो. त्यामुळे पावसाळी लुकमध्ये तोच तोपणा येणार नाही. 

Edited By - Prashant Patil