सेलिब्रिटी वीकएण्ड : घर आवरण्याचा ‘ऊर्जादायी’ मंत्र

शिल्पा ठाकरे, अभिनेत्री
Friday, 27 November 2020

सुटीचा दिवस म्हणजे माझ्यासाठी ‘मी टाइम.’ त्या दिवशी मी घरी असले, तरी फार उशीर न करता वेळेवर उठते. मी स्वच्छतेच्या बाबतीत खूप काटेकोर आहे आणि आठवडाभर कामात व्यस्त असल्यामुळे जी काही घरातली आवराआवर असेल, साफसफाई असेल, ती करणं हे माझं सकाळी उठल्यावर पहिलं काम असतं.

सुटीचा दिवस म्हणजे माझ्यासाठी ‘मी टाइम.’ त्या दिवशी मी घरी असले, तरी फार उशीर न करता वेळेवर उठते. मी स्वच्छतेच्या बाबतीत खूप काटेकोर आहे आणि आठवडाभर कामात व्यस्त असल्यामुळे जी काही घरातली आवराआवर असेल, साफसफाई असेल, ती करणं हे माझं सकाळी उठल्यावर पहिलं काम असतं. माझं असं ठाम मत आहे, की तुमचं घर नीट टापटीप असलं, नको असणाऱ्या वस्तू वेळीच काढून टाकल्या, की जी काही निगेटिव्हिटी असते, ती दूर होऊन एक फ्रेशनेस तुमचा तुम्हालाच जाणवायला लागतो आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा येते. यासोबतच दिवसातला काही वेळ स्वतःच्या फिटनेसला देणं मी आवश्यक समजते. त्यामुळे वीकएण्डला न चुकता तासभर का होईना; पण मी व्यायाम करणार, हे माझं ठरलेलं असतं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी पुण्याला माझ्या कुटुंबीयांपासून दूर राहते. इथं मी माझ्या आईच्या हातचं जेवण फार मिस करते. इथं एकटी राहत असले, तरी बाहेरचं न जेवता घरी बनवलेले अन्नपदार्थ खाण्याला मी प्राधान्य देते. घरचं जेवणच हवं, असा माझा अट्टहास असल्यामुळं मला स्वतःला सगळं जेवण उत्तम करता येतं. घरी असल्यावर अगदी आवडीनं वेगवेगळे पदार्थ बनवणं माझं सुरू असतं. मला फिरायला, शॉपिंग करायला प्रचंड आवडतं. मी मूळची नागपूरची, माझे मित्र-मैत्रिणी जास्तकरून तिकडचेच. त्यामुळं इथं अनेक वेळा मी एकटीच गाडी काढते आणि छान मनसोक्त फिरते. सकाळी लवकर उठून सिंहगडावर जाणं, ही माझी आणखी एक आवडती गोष्ट. तसेच, मी आवर्जून मॉर्निंग वॉकला जाते. तिथं आमचा एक ग्रुप आहे; ज्यात कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींपासून ते अगदी ७०-७५ वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत असे सगळे लोक येतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आम्ही सगळे एकत्र ट्रेकलाही जातो. पुण्याजवळचे लहान-मोठे ट्रेक्स, रायगड, सिंहगड असे अनेक ट्रेक्स आम्ही एकत्र केले आहेत. त्या वेळी अनेक आजी-आजोबाही येतात ट्रेकला. त्यांच्याकडं पाहून आपल्यातही एक कॉन्फिडन्स आणि एक हुरूप येतो ट्रेकिंग करायला. यासोबतच पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यात अनेक विविध विषयांवरची नाटकं, कलाकृती सादर होत असतात; त्या मी न चुकता पाहते. घरी असल्यावर मी सीरिज आणि चित्रपट बघते. नाटक असो,  चित्रपट असो अथवा सीरिज असो, या सगळ्यातून आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि नकळत आपण कलाकार म्हणून घडत जातो. परंतु, जेव्हा मी नागपूरला आमच्या घरी जाते तेव्हा तो संपूर्ण वेळ हा माझ्यासाठी फॅमिली टाइम असतो.

तिथं गेल्यावर मित्र-मैत्रिणींना भेटणं, आई-बाबांबरोबर वेळ घालवणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, आईला कामात मदत करणं, हे मी खूप एन्जॉय करते. तिकडं अशाप्रकारे मस्त वेळ घालवून आनंदी मनानं पुण्याला आल्यावर मी पुन्हा एकदा काम करायला एकदम उत्साही असते.

(शब्दांकन - राजसी वैद्य)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article write celebrity weekend actress shilpa thakre home