जोडी पडद्यावरची : संगीतातली ‘केमिस्ट्री’ महत्त्वाची

Chinar and Mahesh
Chinar and Mahesh

नवीन वर्षांत म्हणजे ‘डार्लिंग’ चित्रपटातील ‘डार्लिंग तू, डार्लिंग तू’ हे शीर्षकगीत चर्चेत आहे. युट्यूबवर लाखो प्रेक्षकांनी ते पाहिले आहे. या गीताचे संगीतकार आहेत चिनार आणि महेश. या दोन दोस्तांची संगीतकार जोडी आपल्याला अनेक वर्षे माहिती आहे. ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टाइमपास २’, ‘कॅरी ऑन देशपांडे’, ‘शर्यत’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांचे संगीतकार म्हणून ही दोन मित्रांची जोडी आपणाला परिचित आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिनार आणि महेश हे दोघे कॉलेजपासूनचे मित्र. जोशी बेडेकर महाविद्यालयात चिनार कॉमर्सला होता, तर महेश आर्ट्‌सला. कॉलेजच्या कार्यक्रमांच्या ऑडिशन्स असायच्या, तेव्हा चिनार आणि महेश ऑडिशनसाठीसुद्धा एकत्र जायचे.

चिनार आणि महेश या दोघांची कॉलेजपासूनची असलेली मैत्री आणि त्यातील केमिस्ट्री ही त्यांच्या संगीतातूनही जाणवते. 

चिनार गाणे सादर करायचा, तर महेश गिटार वाजवायचा. चिनार आणि महेश या दोघांनी स्थानिक पातळीवरील दुकानांसाठी एकत्रपणे जिंगल्स बनवायला सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर हे दोघेही त्या दुकानात प्रत्यक्ष जाऊन ती जिंगल सादर करायचे आणि त्या दुकानाच्या जाहिरातींचा व्हॉइस ओव्हरसुद्धा स्वतःच्या आवाजात करायचे. ‘टाइमपास’ या चित्रपटानं मात्र त्या दोघांच्या जीवनाने एक वेगळंच वळण घेतलं.

‘डार्लिंग’ या चित्रपटाच्या शीर्षकगीताचादेखील एक किस्सा आहे. चिनार आणि महेश दोघांनीही हा किस्सा सांगितला. शीर्षकगीत समीर सामंतला लिहायला सांगितले होते. त्यांनी गाण्याचा काही भाग लिहिला होता; पण तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता आणि तिथून तो गाणे लिहून पाठवत होता; पण चिनार आणि महेश या दोघांनाही समीर हॉस्पिटलमध्ये असल्याचे माहीत नव्हते. रेकॉर्डिंगची तारीख जवळ आली होती. तेव्हा ‘डार्लिंग तू, डार्लिग तू’ ही ओळ आणि गाण्याचा काही भाग तयार होता. तेव्हा स्वतः महेशनं उर्वरित गाणे पूर्ण केले. 

महेश म्हणाला, ‘‘चिनार स्वतः उत्तम गातो, त्यामुळे संगीतकार या नात्याने तो एखाद्या गायकाला किंवा गायिकेला मार्गदर्शन करताना अतिशय उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करतो.’’ तर चिनारने सांगितले, की ‘‘महेश खूप चिकित्सक आहे. एखादे गाणे ऐकताना किंवा चाल करताना त्याला वाटले, की आपण थोडे ते गीत अजून चांगल्या प्रकारे करून बघू, तर तो ते मोकळेपणाने सांगतो आणि आम्ही दोघांनी संगीत दिलेले गीत अधिकाधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत कसे पोचेल, याकडे तो विशेष लक्ष देत असतो.’’ 

(शब्दांकन : गणेश आचवल)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com