मेकअप-बिकअप : ओळख मेकअप ब्रशची!

makeup
makeup

ब्रशने केलेल्या मेकअपमुळे आपल्याला चांगले फिनिशिंग यायला मदत मिळते. तसेच हा मेकअप बोटांनी केलेल्या मेकअपपेक्षा जास्त उठावदार व पॉलिश्‍ड लूक देतो. मेकअप करताना लागणाऱ्या ब्रशचे विविध प्रकार आहेत. योग्य ब्रश वापरल्यासच, योग्य परिणाम पाहायला मिळतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्लश किंवा कंटूर ब्रश : हा ब्रश प्रामुख्याने ब्लशर लावण्याकरीता वापरला जातो. तसेच हव्या असेल तेवढ्याच भागात ब्लशर लावणे यामुळे सोपे जाते. 

चीक हाइलायटर ब्रश : हा ब्रश ‘कंटूर ब्रश’प्रमाणेच काम करतो. तुम्हाला जास्त मेकअप करण्याची सवय असल्यास, या ब्रशची तुम्हाला मदत होऊ शकते. हा कंटूरला पर्यायी ब्रश असल्याने, तुम्ही किती प्रमाणात मेकअप करता यावर कोणता ब्रश वापरायचा हे ठरवू शकतो. नावाप्रमाणे हा ब्रश चीकबोन हायलाईट करण्यासाठी वापरला जातो. 

फाउंडेशन स्टिपलिंग ब्रश : या ब्रशने फाउंडेशन घेऊन चेहऱ्यावर लावल्यास समप्रमाणात फाउंडेशन लागते. कुठे जास्त किंवा कुठे कमी असे वाटत नाही. तसेच फाउंडेशनचा थरही दिसून येत नाही. फाउंडेशन हा मेकअपचा बेस असल्याने हा ब्रश तुमच्या ‘मेकअप किट’मध्ये असायलाच हवा. 

फ्लॅट फाउंडेशन ब्रश : तुम्ही हेवी मेकअप करत असाल, तसेच मेकअप करण्यात एक्स्पर्ट असाल, तर ‘फ्लॅट फाउंडेशन ब्रश’ तुमच्या उपयोगी पडेल. मात्र, या ब्रशचा वापर नेमका कसा करावा हे ठाऊक नसल्यास यामुळे चेहऱ्यावर पॅचेस दिसण्याची शक्यता असते. नव्याने मेकअप शिकणाऱ्यांनी हा ब्रश सुरवातीला वापरणे टाळावे. 

लिप ब्रश : तुमच्या मेकअपमध्ये ओठ आणि डोळे सर्वांत महत्त्वाचे असतात. ओठांना योग्य आकार देण्यासाठी किंवा ओठ लहान असल्यास ते मोठे दिसण्यासाठी ‘लिप ब्रश’ उपयोगी ठरतो. हा ब्रश वापरताना आधी ओठांची बॉर्डर काढून घ्यावी. नंतर संपूर्ण ओठांना लिपस्टिक लावावी.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com