मेकअप-बिकअप : डोळे आकर्षक बनण्यासाठी...

डोळे हा आपला अतिशय महत्त्वाचा अवयव. त्यांचं सौंदर्य खुललं की संपूर्ण चेहरा खुलतो. डोळ्यांच्या मेकअपसाठी काही साध्यासोप्या टिप्स आपण बघू या.
Makeup
MakeupSakal

डोळे हा आपला अतिशय महत्त्वाचा अवयव. त्यांचं सौंदर्य खुललं की संपूर्ण चेहरा खुलतो. डोळ्यांच्या मेकअपसाठी काही साध्यासोप्या टिप्स आपण बघू या.

  • डोळे लहान असले, तर पापण्या कर्ल करून घ्या. त्यामुळे डोळे मोठे दिसतील आणि त्यांचा लूकही बदलून जाईल.

  • पापण्यांवर प्रायमर लावण्यापूर्वी त्या स्वच्छ असतील असे बघा.

  • मस्कारा लावताना दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मस्काऱ्यांचा वापर करा. एक पापण्यांच्या केसांची जाडी वाढवण्यासाठी आणि दुसरा त्यांची लांबी ठळकपणे दिसण्यासाठी.

  • डोळ्यांच्या रंगांनुसार परफेक्ट आयलायनर निवडा. हा रंग चुकला, तर संपूर्ण मेकअप चुकू शकतो.

  • आयब्रोज करताना तुमचं व्यक्तिमत्त्व लक्षात घ्या. भुवयांचा आकार तुमचं व्यक्तिमत्त्व कशा प्रकारचं आहे हे निश्चित करत असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com