किचन गॅजेट्स : आटा मेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atta maker

भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे पोळी-भाजी. पोळ्यांशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही. परंतु या गरमागरम पोळ्या ताटात येण्यापूर्वी, गृहिणींना भरपूर कष्ट घ्यायला लागतात.

किचन गॅजेट्स : आटा मेकर

भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे पोळी-भाजी. पोळ्यांशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही. परंतु या गरमागरम पोळ्या ताटात येण्यापूर्वी, गृहिणींना भरपूर कष्ट घ्यायला लागतात. कणीक मळणे हा त्यातील सगळ्यात कंटाळवाणा भाग आहे. रोटी, पराठे, पुऱ्या किंवा अनेकदा पिझ्झा बेस बनवण्यासाठीसुद्धा भारतीय स्वयंपाकघरात कणकेचा वापर केला जातो. म्हणूनच गृहिणींचा कामाचा भार हलका व्हावा म्हणून बाजारात आटा मेकरचा पर्याय उपलब्ध आहे. पिठात हात न टाकता मऊसूत कणीक मळणे आता शक्य आहे. हा आटा मेकर वापरण्यास अगदी सोपा आहे. हा पर्याय फक्त गृहिणींसाठीच नव्हे, तर घरापासून दूर राहणाऱ्या सर्वांसाठीच फायदेशीर आहे.

आटा मेकरची वैशिष्ट्ये...

  • कणीक मळताना त्यात पाणी घालण्याचा अंदाज चुकल्यास ती अधिक सैल होते किंवा घट्ट होते. त्यामुळे हमखासपणे पोळ्या लाटताना अडचण येते. त्यामुळे अशा परिस्थितीत आटा मेकरचा पर्याय उत्तम मदतनीस ठरतो. यात असणाऱ्या मेजरिंग कप्समुळे अगदी मापाचा अंदाज घेऊनच कणीक कोणालाही छान मळता येते.

  • फक्त गव्हाचीच नव्हे, तर मैद्याची कणीकही यात मळणे शक्य आहे. शिवाय मिल्कशेक, ताकसुद्धा यात करता येते.

  • यात कणीक मळण्यासाठी मोठे भांडे, झाकण आणि तीन मेजरिंग कप्स मिळतात. त्यात असणाऱ्या मेजरिंग कपच्या साहाय्याने पीठ, तेल, मीठ आणि पाणी त्यात टाकायचे आणि झाकण बंद करून झाले, की हॅंडलच्या साहाय्याने गोलाकार फिरवायचे. अगदी काही मिनिटातच कणकेचा गोळा तयार होतो.

  • उत्तम फूड ग्रेड प्लास्टिक मटेरियलचा यात वापर केला असल्याने, वस्तू दीर्घकाळ टिकते.

Web Title: Article Writes Kitchen Gadgets Atta Maker

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top