किचन गॅजेट्स : डिश सोप डिस्पेन्सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dish soap dispenser
किचन गॅजेट्स : डिश सोप डिस्पेन्सर

किचन गॅजेट्स : डिश सोप डिस्पेन्सर

किचनमध्ये वेळोवेळी भांडी घासावी लागतात; मात्र विशेषतः लिक्विड सोप वापरत असलात तर मोठा प्रश्न निर्माण होतो. बाटलीतून प्रत्येक वेळी सोप काढायचा कसा आणि तो योग्य पद्धतीनं स्क्रबरला लावायचा कसा असा प्रश्न असतो. अनेकदा स्पंजला अन्नाचे कण चिकटले, की ते लिक्विड सोप ठेवलेल्या भांड्यात जाऊन सगळाच लिक्विड सोप खराब होतो. हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत ‘लिक्विड सोप डिस्पेन्सर’ या नव्या सुविधेनं. या डिस्पेन्सरमध्ये दोन भाग असतात. खालच्या भागात लिक्विड सोप घालायचा असतो. वरच्या ट्रेसारख्या भागावर स्पंज किंवा स्क्रबर ठेवायचा असतो. हा स्पंज किंवा स्क्रबर जोरात दाबला, की आपोआप खालचा लिक्विड सोप थोड्या प्रमाणात वर येऊन त्याला लागतो. त्यामुळे लगेच तो स्पंज घेऊन तुम्ही त्याचा वापर भांड्यांवर करू शकता. यामध्ये नेमक्या प्रमाणात लिक्विड सोप वर येत असल्यानं त्याची बचत होते आणि सोप प्रत्येक वेळी ओतायचा कुठे, किती सोप लावायचा वगैरे गोष्टींची चिंताही करायला लागत नाही. बहुतेक सोप डिस्पेन्सरबरोबर वरच्या बाजूला बरोबर बसणारा स्पंज किंवा स्क्रबरही येतो. ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या शॉपिंग साइट्सवर असे सोप डिस्पेन्सर उपलब्ध असतात.

सोप डिस्पेन्सरची वैशिष्ट्ये

  • आकार अगदी तळहात मावेल इतकाच असल्यानं हा सोप डिस्पेन्सर कुठंही ठेवता येतो.

  • लिक्विड सोप प्रत्येक वेळी थोड्याच प्रमाणात येत असल्यानं त्याची बचत होते.

  • लिक्विड सोप आणि स्पंजचा भाग हे दोन्ही स्वतंत्र असल्यानं लिक्विड सोप खराब होत नाही.

  • लिक्विड सोप वर येण्यासाठी मध्ये फक्त स्प्रिंग आणि पोकळ नळी असल्यानं नादुरुस्त होण्याची शक्यता कमी असते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :kitchenarticle
loading image
go to top